Pathaan Boxoffice Collection: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल 25 जानेवारी रोजी पठाण प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. इतकंच काय तर चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार दुपारपर्यंत चित्रपटानं पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपॉलिसमध्ये एकूण 20.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटानं 25 कोटींची कमाई केली आहे. तर पठाणनं पहिल्याच दिवशी मल्टिप्लेक्समध्ये इतकी कमाई करत KGF 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. KGF 2 नं पहिल्या दिवशी 22.15 कोटी कमावले होते. तर एक्सपर्ट्सप्रमाणे 'पठाण' ओपनिंग डेला 50 कोटींच्या जवळपास कलेक्शन करेल. KGF 2 पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली होती. तर पठाण हा सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.
चित्रपटगृहांमध्ये मध्यरात्री 12.30 वाजता चित्रपटाचे शो सुरू झाल्याचे आपण गेल्या अनेक दिवसांपूर्वी आपल्याला हे पाहायला मिळाले नव्हते. चाहत्यांमध्ये किंग खानचा चित्रपट पाहण्याचा उत्साह पाहून वायआरएफच्या निर्मात्यांनी रात्री उशिरा शो सुरू केले आहेत. यासोबतच दुसऱ्या दिवशी सकाळी शो देखील वाढवण्यात आले आहेत.
हेही वाचा : कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते Amrapali Dubey
26 जानेवारीची सुट्टी 'पठाण'साठी फायदेशीर ठरणार आहे. आतापर्यंत हा चित्रपट जगभरात आठ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. दिवस रात्रीचे बहुतेक शो हाऊसफुल्ल झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट येत्या पाच दिवसांत 200 कोटींहून अधिक कमाई करू शकतो. चाहत्यांमध्ये असलेली जबरदस्त क्रेझ पाहून यशराज फिल्म्सनेही रात्री 12.30 वाजता आपले शो सुरू केले आहेत. दिल्ली, एनसीआरमध्ये तिकिटांची किंमत 2400 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यात भगव्या बिकिनी परिधान करत बोल्ड डान्स केला होता. त्यावर अनेक धार्मिक संघटनांनी विरोध केला आणि चित्रपटावर निशाणा साधला आहे. त्यानंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीसह गाण्यातील काही वाक्यांवरही आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपानंतर ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने चित्रपट निर्मात्यांना काही बदल सुचवले.
इतकंच काय तर बॉयकॉट 'पठाण' देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला होता. मात्र, चित्रपट पाहण्यासाठी गर्दी पाहता त्याचा काही परिणाम झाला नाही असे समोर आले आहे. या चित्रपटात शाहरुख भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. तर चित्रपटात दीपिका आणि जॉन अब्राहम (John Abrahm) यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद आहे.