अभिनेत्री परिणीती चोप्रा असं का म्हणतेय, 'तुमच्यात ताकद हवी'

अभिनेत्री परिणीती चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्रीमधला आपल्या अनुभव शेअर केला आहे.

Updated: Oct 26, 2021, 04:46 PM IST
अभिनेत्री परिणीती चोप्रा असं का म्हणतेय, 'तुमच्यात ताकद हवी' title=

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्रीमधला आपल्या अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, २०११मध्ये 'लेडिज वर्सेस रिकी बहल' सिनमेातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. परिणीतिने हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक दशक पुर्ण केलं आहे. 

अभिनेत्री परिणीतिने मीडियाशी बोलताना सांगितलं की, माझं आज पर्यंत खुप छान करिअर राहिलं आहे. हे एक अद्भूत जीवनासारखंच आहे. आयुष्यात तुम्हाला यश आणि अपयश दोन्ही मिळालं पाहिजे. सुख: आणि दुख: दोन्ही आयुष्यात खुप महत्वाचं आहे.

परिणीतीने या गोष्टींवर कायम ठेवलं लक्ष 
याबरोबर अभिनेत्रीने सांगितलं की, जेव्हा तुम्ही सक्सेस करिअरबद्दल विचार करतात. त्यावेळी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदाच याकडे लक्ष दिलं पाहिजे की, कॅमेरासमोर आणि कॅमेराच्या मागे तुम्हाला हिट सिनेमा, फ्लॉप सिनेमा पाहिल्या पाहिजेत. तिने सांगितलं की, एका यशस्वी करिअरसाठी अपयश देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. सगळे अनुभव घेतल्यानंतरच तुम्ही यशस्वी होवू शकता.

अभिनेत्रीने सांगितला यशस्वी होण्याचं सिक्रेट
'द गर्ल ऑन द ट्रेन', 'सायना', 'संदीप और पिंकी फरार' सारखे एका मागोमाग एक तीन हिट सिनेमा देणारी परिणीतीने या दरम्यान आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले. परिणीतीने सांगितलं की, ''तुमच्यात ताकद हवी कारण मी अपयशाला मिठी मारुनच आज येवढ्या लांब पोहचू शकली.''