Parineeti Chopra Engagement Priyanka Chopra Reached Delhi : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आज शनिवारी 13 मे रोजी तिच्या आयुष्यातील एका नवीन चॅप्टरला सुरु करणार आहे. परिणीति ही आज 'आम आदमी पार्टी' खासदार राघव चढ्ढा यांच्याशी तिचा आज साखरपुडा आहे. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम हा दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. त्यानिमित्तानं बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील पोहोचली आहे. प्रियांका लंडनवर दिल्लीला पोहोचली आहे. तिचे विमानतळावरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
प्रियांकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियांका दिल्ली विमानतळावर पोहोचल्याचे दिसत आहे. प्रियांकानं यावेळी ऑकर रंगाचं स्वेट शर्ट आणि ट्रॅक परिधान केली आहे. प्रियांकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रियांकाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या प्रियांकासोबत फोटो काढण्यासाठी काही चाहते तिच्या खूप जवळ येतात आणि तेव्हा प्रियांका थोडी घाबरते.
रिपोर्ट्सनुसार, परिणीति आणि राघव यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम हा संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, त्यांचा साखरपुडा हा पारंपरिक पद्धतीनं होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सुखमनी साहिब पथनं होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता अरदास होईल.
रिपोर्ट्सनुसार, परिणीतिच्या साखरपुड्याच्या ड्रेस हा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं तयार केला आहे. त्यांच्या कपड्यांचा रंग पेस्टल असल्याचे देखील म्हटले जाते. तर राघव यांचा ड्रेस हा पवन सचदेवनं डिझाइन केला आहे. दरम्यान, परिणीतिच्या साखरपुड्यात बॉलिवूडमधील तिचा बेस्ट फ्रेंड करण जोहर हजेरी लावणार असे देखील म्हटले जाते. त्यांच्या साखरपुड्यात एकूण 150 पाहुणे हजेरी लावणार असल्याचे म्हटले जाते. तर परिणीति आणि राघव यांच्या साखरपुड्याला पाहता अभिनेत्रीचं मुंबईचं घर वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्सनं डेकोरेट केलं आहे. तर राघव यांचं घर देखील सुंदर डेकोरेट करण्यात आलं आहे. त्यांचं घर हे फुलांनी सजवण्यात आलं आहे.
हेही वाचा : 18 व्या वर्षी प्रियंका चोप्रा Miss World झाली, तेव्हा निक जोनस काय करत होता माहितीये का? सासूनेच केला खुलासा
दरम्यान, परिणीति आणि राघव हे दोघं हिवाळ्यात लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. त्यांचं लग्न हे खूप ग्रॅंड असेल असं म्हटलं जातं आहे. तर लग्नानंतर परिणीति आणि राघव मुंबई आणि दिल्लीत रिसेप्शन पार्टी देतील, यात सगळेच सेलिब्रिटी आणि राजकारणी हजेरी लावतील. तर राघव आणि परिणीति यांची पहिली भेट ही लंडनमध्ये कॉलेजमध्ये झाली होती.