Dahaad Web Series Review: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'दहाड' या वेबसिरिजची. क्राईम आणि थ्रिलर वेबसिरिज ओटीटीवर तूफान (Dahaad Release Date) गाजत आहेत त्यातीलच 'दहाड' ही एक वेबसिरिज आहे असं म्हणता येईल. सोनाक्षी सिन्हा हिनं 'दहाड' या वेबसिरिजमधून ओटीटीविश्वात पदार्पण केलं आहे. या वेबसिरिजचे एकूण 8 भाग आहेत आणि ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली आहे. सोनाक्षी सिन्हासह गुलशन देवैया, सोहम शाह आणि विजय वर्माही या वेबसिरिजमध्ये प्रमुख भुमिकेत आहेत. (Dahaad Web Series Review sonakshi sinha dahaad movie wins heart of audience know more about the series and story)
राजस्थानस्थित मांडवा हे गावं. तिथल्या एका पोलिस स्टेशनमध्ये एक भाऊ आपली (Suspense Thriller) बहिण हरवली असल्याची तक्रार घेऊन येतो. यावेळी दुसऱ्या एका सीनमध्ये लव्ह जिहादची एक घटना समोर येते. तेवढ्यात पोलिसांना हा भाऊ आपलीच बहिण या प्रकरणात अडकल्याचे सांगतो. पोलिस त्याच्या बहिणीची तक्रार गांभिर्यानं न घेता गावातील ठाकूरची मुलगी एका मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यानं तिची केस राजकीय दबावामुळे सर्वातोपरी प्रयत्न करत सोडवताना दिसतात हे पाहून तो भाऊ आपलीही बहीण एका मुस्लिम मुलासोबत पळून गेली असल्याचे सांगतो.
हळूहळू पोलिसांना कळते की अशा एक दोन नव्हे तर 29 मुली गायब झाल्या आहेत. आणि या मुलींनी सायनाईड पिऊन (Dahaad Story) आत्महत्या केल्याचे कळते. परंतु त्यानंतर समोर येते की यात काहीतरी गोम आहे आणि इतकं गंभीर प्रकरण आत्महत्येचे नसून सिरियल किलरचे आहे.
या सर्व प्रकरणाची जबाबदारी ही मांडवा पोलिस ठाण्याच्या एसआय अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा) यांच्याकडे येते. यासोबतच तिचे (Dahaad Cast) सहकारी कैलाश पारघी (सोहम शहा) आणि अधिकारी देवीलाल सिंह (गुलशन देवय्या) यांच्यावरही जबाबदारी सोपविण्यात येते.
या कथेतला मुख्य विलन हा विजय वर्मा आहे. त्यानं आपला अभिनय अतिशय उत्कृष्टपणे पेलेला आहे. 29 मुलींना पळवून विजय वर्मा (आनंद स्वर्णकर) या मुलींचा खून करतो. परंतु यामागे नक्की कारण काय असते. इतका मोठा गुन्हा तो कसा करतो. याबद्दल अंजलीला सुगावा कसा लागत जातो. याबद्दल 4-5 व्या भागात प्रेक्षकांसमोर सस्पेन्स हळूहळू उघडत जातो. पोलिसी पेशा आणि त्यातून आजूबाजूला दिसणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांचे या खूनाशी असलेले संबंध आणि आनंद स्वर्णकरची कहाणी हळूहळू उलघडत जाते. या सिरिजमध्ये तुम्हाला सुरूवातीलाच कळते की खुनी कोण आहे. परंतु आनंद स्वर्णकर, व्यवसायानं एक प्राध्यापक या मुलींचा खून का करतो हा प्रश्न प्रेक्षक शेवटपर्यंत शोधत जातात.