Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण ठरलं मग! पाहून म्हणाल केवढा तो खर्च...!

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची मोठी माहिती समोर आली आहे. ते कुठे आणि कधी लग्न बंधनात अडकणार याची माहिती आली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2023, 01:29 PM IST
Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण ठरलं मग! पाहून म्हणाल केवढा तो खर्च...! title=
(Photo Credit : Social Media)

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्राचा आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत नुकताच साखरपुडा झाला. आता परिणीती आणि राघव हे दोघं त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. ते दोघं कधी आणि कुठे लग्न बंधनात अडकणार असे अनेक प्रश्न त्या दोघांना चाहत्यांना पडले आहेत. तर आता परिणीति आणि राघव यांच्या लग्नाचे स्थळ ठरल्याचे म्हटले जात आहे. चला तर जाणून घेऊया परिणीती आणि राघव हे दोघे कुठे लग्न बंधनात अडकणार आहेत. 

रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव हे दोघे द ओबरॉय उदयविलास या उदयपुरमधील लक्झरीयस हॉटलमध्ये सप्तपदी घेणार आहेत. त्या दोघांना त्यांचं लग्न हे जितकं साधं आणि ट्रेडिशनल ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा ते निर्णय घेत आहेत. इतकंच काय तर त्याचं लग्न हे खूप इंटिमेट असणार आहे. हे हॉटेल झील पिचोलाच्या किनाऱ्यावर आहे. परिणीती आणि राघव या वर्षी सप्टेंबर किंवा मग नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. पण लग्नाचं ठिकाण आणि त्यासोबत लग्नाची तारिख दोन्ही गोष्टी ऑफिशियल करण्यात आलेल्या नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, परिणीति आणि राघव चड्ढा हे दोघं पारंपरिक पद्धतीनं लग्न बंधनात अडकणार आहेत. परिणीति आणि राघव हे पारंपारिक पद्धतीनं लग्न बंधनात अडकणार आहेत. हेच आपण त्यांच्या साखरपुड्याच्या वेळी देखील पाहिले. त्यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र देखील उपस्थित असणार आहे. त्यात तिची बहीण प्रियांका चोप्रा देखील आहे. परिणीतीच्या लग्नाच्या वेळी प्रियांका तिचा पती निक जोनस आणि लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत दिसणार आहे. प्रियांकानं देखील राजस्थानमध्ये एका लक्झरीयस पॅलेसमध्ये निक जोनस सोबत लग्न केले होते. तर राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकलेल्या कलाकारांमध्ये प्रियांका- निक व्यतिरिक्त, कतरिना कैफ- विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणी हे कलाकार आहेत. या कलाकारांनी लग्नासाठी राजस्थान हे स्थळ निवडलं होतं. 

हेही वाचा : आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत Gautami Patil म्हणाली...

परिणीति आणि राघव यांच्या साखरपुड्याच्या बातमीआधी त्यांचा रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. अशात त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावेळी परिणीति आणि राघव यांनी या बातमीवर दुजोरा दिला नव्हता. तर त्यांनी अचानक सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत त्यांचे नाते अधिकृत केले होते.