अश्रू आणि त्यामागोमाग खंत...; लग्नाआधीच गरोदर असणारी इलियाना अचानक असं का म्हणू लागली?

Ileana Dcruz Boyfriend Photos: अभिनेत्री इलियाना डिक्रुजनं आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो पुन्हा एकदा शेअर केला आहे. परंतु यावेळी मात्र तिनं प्रचंड गोपनियता ठेवली आहे. तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 

Updated: Jun 10, 2023, 05:28 PM IST
अश्रू आणि त्यामागोमाग खंत...; लग्नाआधीच गरोदर असणारी इलियाना अचानक असं का म्हणू लागली? title=
June 10, 2023 | Ileana dcruz shares an unrecognizable pic with her boyfriend fans reacts (Photo : Ileana D'cruz | Instagram)

Ileana Dcruz Boyfriend Photos: सध्याची पिढी ही बोल्ड आणि बिनधास्त आहे. स्वैराचारी आहे. आपलं आयुष्य हे आपल्या नियमांप्रमाणे जगताना दिसते. स्वतंत्रपणे जगताना दिसते परंतु सोबत ती जबाबदारीनंही वागते. अशातच आता रिलेशनशिप्सच्या बाबतीतही घडू लागले आहे परंतु बॉलिवूड सेलिब्रेटी मात्र आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खूप मोकळेपणानं बोलताना दिसतात नाहीतर आपल्या नात्याबद्दल प्रचंड प्रमाणात गोपनियता बाळगतात. अनेक जण यांना पब्लिसिटी स्टंट म्हणून उकसवतात. परंतु पब्लिक फिगर असूनही आपल्या आयुष्याबद्दल कमालीची गोपनियता बाळगल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले जाते. अशातच चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिची. आपल्या पर्सनल लाईफबद्दल ती प्रचंड गोपनियता बाळगताना दिसते. 

अशातच चर्चा आहे ती म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीची. आपल्या लग्नाबद्दल किंवा आपल्या रिलेशनशिपबद्दल तिनं अद्याप कुठलाच खुलासा केलेला नाही त्यामुळे अचानक तिनं दिलेल्या तिच्या प्रेग्नन्सीच्या न्यूजमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मध्यंतरी तिनं आपल्या बेबी बंपचा फोटो व्हायरल केला होता. त्यामुळे तिच्या प्रेग्नन्सींची बरीच चर्चा रंगली होती. परंतु लग्न न करता इलियाना डिक्रुज गरोदर आहे मग तिचा फियान्से किंवा होणारा नवरा, पार्टनर आहे तरी कोण? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. याबद्दल कमेंट्समधून तिला थेट प्रश्नही विचारण्यात आले होते. परंतु आता अखेर तिनं आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो समोर आणला आहे परंतु यावेळी तिनं गोपनियता कायम ठेवली आहे. 

आधी प्रेग्नंन्सीची न्यूज आणि मग त्यानंतर आपल्या बेबी बंपचा फोटो मग एन्गेजमेंट रिंगचा फोटो आणि आता आपल्या बॉयफ्रेंडची झलक असं करत करत तिनं आपला सेस्पेन्स कायम ठेवला आहे. अशाच आता तिनं आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो पोस्ट केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अनेकजण हा नक्की कोण आहे याबद्दल तर्कवितर्क लावणं सुरू केलं आहे. परंतु यावेळी तिनं फोटो असा एडिट केलाय की त्याचा चेहरा दिसतोय परंतु ही व्यक्ती नक्की कोण हे ओळखणंच कठीण झालं आहे. परंतु अनेक लोकप्रिय सेलिब्रेटीही तिच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. 

या फोटोखाली नानाविध कमेंट्स येताना दिसत आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकर, मलायका अरोरा, नर्गिस फखरी यांनी तिच्या या पोस्टवर सुंदर कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती या पोस्टमध्ये लिहिलंय की, 

गरोदरपण एक अनमोल आशीर्वाद आहे...
मला असं वाटलं नाही की मी हा अनुभव घेण्याइतकी भाग्यवान आहे. म्हणून मी या प्रवासात स्वतःला खूप भाग्यवान समजते. तुमच्या आत वाढत असलेलं जीवन किती सुंदर वाटतं याचं वर्णन मी करूच शकत नाही. माझ्या पोटातील बाळ मला सारखं पोटात पाय मारत आहे. त्यामुळे या भावनेनं मी त्याला कधी एकटा भेटत्येय असं झालंय. 

हे दिवस खूप कठीण आहेत पण मी प्रयत्न करत आहे.
ते खूपच छान आहेत. मी सर्व उपभोगते आहे. काही गोष्टी फक्त हताश वाटतात... आणि अश्रू आहेत. मग अपराधीपणाचीही भावना आहे. सोबतच ही भावना मला माझं डोकं खाली करायला भाग पाडते.  मी आभारी असले पाहिजे, इतक्या क्षुल्लक गोष्टीबद्दल रडत नाही. मी अधिक मजबूत असले पाहिजे. मी पुरेशी बलवान नसल्यास मी कोणत्या प्रकारची आई होईल?

आणि मला माहित नाही की मी कोणत्या प्रकारची आई होईल. मला खरंच नाही. मला फक्त इतकंच माहित आहे की मी या लहान जीवावर प्रेम करते. हा लहान जीव माझे अश्रू पुसतो. मला बळ देतो.