पंकजा मुंडेना का फॉलो करत होत्या ३ ते ४ गाड्या

झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' हा नवाकोरा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Updated: Dec 31, 2021, 08:59 PM IST
पंकजा मुंडेना का फॉलो करत होत्या  ३ ते ४ गाड्या title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' हा नवाकोरा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करतो. यामध्ये कलाकार विविध पदार्थ बनवताना दिसतात. त्यामुळे किचनवर कल्ला तर होतोच मात्र यामुळे त्याचं स्वयंपाक स्कील देखील सर्वांना पाहयला मिळतं. पण यावेळी या कार्यक्रमात कलाकारांनी नव्हे तर राजकिय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शोमध्ये पंकजा मुंडे, रोहित पवार, प्रणिती शिंदे या राजकिय नेत्यांनी हजेरी लावली.

प्रशांत दामले यांनी पंकजा मुंडे यांना विचारलं ''आज जर गोपिनाथ मुंडे साहेब असतं तर, ते काय म्हणाले असते तुम्हाला? समजा ते वर बसलेत ताईंच्या जागी ते बसलेत आणि सांगत असले अगं हे काय करतेस त्यांच्या बद्दल काय भावना आहेत. आज ते काय म्हणाले असते. यावर पंकजा ताई भावूक होत म्हणाल्या ते नरवस झाले असते. मी जेव्हा कुठला परफॉर्मन्स करायचे. कुठलं भाषण करायचे. 

काही काम करायचे. तर ते नेता म्हणून बघायचे नाही तर पिता म्हणून फार नरवस व्हायचे. आणि खूप काळजी करायचे. जेव्हा मी परळीवरुन निघायचे रात्री तर मला नगर क्रॉस करताना दिसायचं मागे की, दोन तिन गाड्या आहेत.  

कुठल्या तरी गाड्या मला फॉलो करतायेत.  तर मी म्हणायचे या गाड्या माझा पाठलाग का करतायेत तर ते म्हणायचे साहेबांनी फोन केलाय त्या निघाल्या आहेत. त्या पोहचे पर्यंत त्यांना घरापर्यंत पोहचवा. तर ते खूप नरवस व्हायचे. आणि ते नरवसच झाले असते. ईथे असले असते तर. आणि त्यांना असं वाटलच असत की माझाच पदार्थ जिंकावा''

किचन कल्लाकारच्या सेटवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हजेरी लावतात. या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले काम पाहत आहेत. तर शो होस्ट करण्याची जबाबदारी संकर्षण कऱ्हाडे करत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.