'या' मालिकेत दाखवला मॅरिटल रेप? चाहत्यांचा संताप अनावर

Serial Tera Bin : या लोकप्रिय मालिकेत नक्की असं काय झालं की चाहत्यांना संताप आला आहे. पाकिस्तानच्या या लोकप्रिय मालिकेत आपल्या आवडत्या कलाकारांना एकत्र अशा परिस्थितीत पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटलं असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 19, 2023, 02:14 PM IST
'या' मालिकेत दाखवला मॅरिटल रेप? चाहत्यांचा संताप अनावर title=
(Photo Credit : Social Media)

Pakistani Serial : पाकिस्तानी मालिका 'तेरे बिन' ही भारतात प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत युमना झैदी ही अभिनेत्री असून तिनं मीरबची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता वहाज अलीनं मुर्तसिम ही भूमिका साकारली आहे. या दोघांनी या मालिकेत दमदार अभिनय केला आहे. या मालिकेनं सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सगळे या मालिकेचं कौतुक करत असताना मालिकेत असं काही झालं की सगळे लोक संतापले आहेत. काहींनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तर काहींनी मालिकेतील कलाकारांचा विरोध केला आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की नक्की असं काय झालं आहे. तर या मालिकेचा नुकताच अखेरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या एपिसोडमध्ये मॅरिटिअल रेप दाखवण्यात आला आहे.  

काल म्हणजेच गुरुवारी या मालिकेचा 46 वा एपिसोड यूट्यूबवर प्रदर्शित झाला. या मालिकेविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. मीरब ही एका अशा कुटुंबातून आहे ज्यात तिला तिच्या आई-वडिलांनी खूप प्रेम दिलं. त्यासोबत खूप संस्कारही दिले. तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य तिच्या घरच्यांनी दिलं. मीरब खूप आनंदी होती पण अचानक तिचा विवाह जबरदस्तीनं मुर्तसिमशी करण्यात आला. सुरुवातीला त्या दोघांना एकमेकांचा राग यायाचा मात्र, थोडे दिवसात ते एकमेकांना ओळखू लागले आणि त्यांच्यातील दुरावा कमी होऊ लागला होता. पण मीरबला मुर्तसिमच्या बहिणीमुळे घर सोडून तिच्या माहेरी जावे लागते.

त्यानंतर त्या दोघांनामध्ये दुरावा येऊ लागतो, पण एक दिवस मुर्तसिमची बहीण मरियमच्या लग्नासाठी मीबर सासरी परत येते. मात्र तेव्हा देखील त्यांच्यात भांडणं बोतात. हे पाहता मीबरही मुर्तसिरवर हाथ उगारते. हे मुर्तसिरला सहन होत नाही आणि तेच आता प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. प्रोमोमध्ये मीरब बेडच्या एका कोपऱ्यात बसली आहे आणि तिचा अवतार पूर्ण खराब झाल्याचे दिसत आहे. तर मुर्तसिम हा बेडवर असल्याचे दिसते. त्या दोघांना या परिस्थित पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. 

हेही वाचा : 'आपली संस्कृती...', बिकिनीमधील फोटो शेअर करत Mitali Mayekar नं नेटकऱ्यांना सुनावले खडे बोल

मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की निर्मात्यांनी मुर्तसिम या भूमिकेला चुकिच्या पद्धतीनं दाखवलं आहे. त्यांना हा सीन पाहून खूप वाईट वाटलं आहे. कारण मालिकेत असं काही होईल याची त्यांना अपेक्षा नव्हती. अनेकांनी ही मालिका आता पाहणार नाही असं म्हटलं आहे. अनेकांनी कमेंट करत हा मॅरिटियल रेप असल्याचे म्हटले आहे. जर तुम्हाला ही मालिका पाहायची असेल तर 'हर पल जियो' या युट्यूब चॅनलवर ही मालिका पाहता येणार आहे. तर याच मालिकेचे आधीच्या एपिसोडचा विचार केला असता त्यांना 12 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. ही मालिका सोशल मीडियावर चांगलीच ट्रेन्ड होते.