'पद्मावती' सिनेमाच्या पोस्टरपेक्षा लोकांमध्ये 'या' प्रश्नाची चर्चा जास्त

दीपिका पादूकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रसिकांसमोर आले. 

Updated: Sep 21, 2017, 10:17 PM IST
'पद्मावती' सिनेमाच्या पोस्टरपेक्षा लोकांमध्ये 'या' प्रश्नाची चर्चा जास्त title=

मुंबई : दीपिका पादूकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रसिकांसमोर आले. 
राजस्थानी पेहरावातील दीपिकाचा राणी 'पद्मावती'च्या भूमिकेतील लूक रिलीज झाला. पोस्टरमधील लूक प्रमाणे दीपिकाच्या भुवया जोडण्यात आल्या आहेत. या नव्या लूकबाबत तिच्या चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. 

जोडलेल्या भुवयांमधील दीपिका काहींना खूपच आवडली. त्यांनी दीपिकाचे कौतुक केले आहे. मात्र काहींनी दीपिकाची तुलना काजोलशी केली आहे.  

 

दीपिकाच्या बुवया जोडलेल्या का आहेत ? या प्रश्नावर एका चाहत्याने कमेंट केली आहे. त्याच्या मते, पूर्वीच्या काळी राण्यांकडे आयब्रो करण्यास वेळ आणि सुविधा नव्हती. पण काही मीडिया रिपोर्ट्सच्या मते, पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळींनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांचा अभ्यास केला आहे. त्यानुसारच दीपिकाचाही लुकही ठरवण्यात आला आहे. 'पद्मावती' चित्रपटात दीपिकाला कमीत कमी केला असल्याचीही माहिती मिळत आहे.