'या' बॅडमिंटनपटूने लावली केबीसीमध्ये हजेरी !

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अमिताभ बच्चनच्या 'कौन बनेगा करोडपती' मध्ये अवतरणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 28, 2017, 05:25 PM IST
'या' बॅडमिंटनपटूने लावली केबीसीमध्ये हजेरी ! title=

नवी दिल्ली : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अमिताभ बच्चनच्या 'कौन बनेगा करोडपती' मध्ये अवतरणार आहे. अमिताभ बच्चनने सिंधूसोबतच फोटो देखील ब्लॉगवर पोस्ट केला आणि सिंधूसोबतची भेट खास असल्याचे म्हटले आहे. फोटोसोबत त्यांनी एक मेसेज देखील पोस्ट केला. त्यात अमिताभ यांनी लिहिले की, "देशाचा गौरव करणाऱ्या सिंधूसोबतची ही भेट खूप खास आहे."

दुसऱ्या फोटो अमिताभ बच्चन हात जोडून उभे आहेत. त्या फोटोबद्दल अमिताभ लिहितात, "एखाद्या महान व्यक्ती आणि खूप काही मिळवलेल्या व्यक्तीसमोर तुम्ही फक्त हात जोडून उभे राहू शकता. अशाप्रकारे कामगिरी करून तू नेहमी देशाला गौरवीत करशील."

केबीसीचे हे नवे सीजन काही दिवसांपूर्वीच चालू झाले आहे. आणि या शो चा टीआरपी टीव्ही च्या इतर मालिकांपेक्षा खूप अधिक आहे.