१९८३ वर्ल्डकपच्या हिरोंना भेटला रणवीर सिंह, बघा फोटो

प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. ते १८८३ वर्ल्डकपमधील भारताच्या विजयावर सिनेमा करत आहेत. या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. रणवीर सिंह या सिनेमात मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका तो साकारतो आहे. 

Updated: Sep 28, 2017, 04:59 PM IST
१९८३ वर्ल्डकपच्या हिरोंना भेटला रणवीर सिंह, बघा फोटो title=

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. ते १८८३ वर्ल्डकपमधील भारताच्या विजयावर सिनेमा करत आहेत. या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. रणवीर सिंह या सिनेमात मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका तो साकारतो आहे. 

रणवीर म्हणाला की, ‘आमच्या पिढीसाठी क्रिकेट हा खेळ महत्वाचा राहिला आहे. पण आधी हा इतका लोकप्रिय नव्हता. कबीरनेया सिनेमाची कथा मला ऎकवली तेव्हा मी हैराण झालो होतो. टीम इंडियाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या अडचणीतून जावं लागलं हे मला कळलं’.

या कार्यक्रमात रणवीर सिंह यांनी याचाही खुलासा केला की, माजी क्रिकेट खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांच्यामुळेच तो अभिनेता बनला. रणवीर म्हणाला की, ७व्या वर्गात असताना ४६ बॉल्समध्ये ७१ रन्स केल्यानंतर त्याने मित्रांसोबत अमरनाथ यांच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता. एका टेस्टमध्ये मी फेल झालो आणि त्यामुळेच मी आज अभिनेता झालो.

महान खेळाडू कपिल देवच्या नेतृत्वातीला टीम इंडियाने १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्टइंडिजला मात देऊन ऎतिहासिक विजय मिळवला होता. या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेसाठी कबीरने रणवीर सिंहची निवड केली आहे. 

कर्णधाराच्या रूपात १९८३ मध्ये टीम इंडियाला पहिला वर्ल्ड कप किताब मिळवून देणारे कपिल देव म्हणाले की, ‘इंग्रजी येत नसल्याने अनेक लोकांनी माझ्या कर्णधार असण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. मी शेतकरी कुटुंबातील होतो. आम्ही जेव्हा खेळणं सुरू केलं, तेव्हा बहुतेक लोक इंग्रजीतच बोलायचे. मला इंग्रजी येत नव्हती. त्यामुळे अनेकांनी माझ्या कर्णधार असण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी एखाद्याला ऑक्सफोर्डमधून आणा आणि मी क्रिकेट खेळणे सुरू ठेवतो’.