करिना कपूरच्या MMS व्हिडिओने एकच गोंधळ; चाहत्यांना धक्का

करीनाने तिचे अफेअर कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही मात्र...

Updated: Dec 13, 2022, 10:53 AM IST
करिना कपूरच्या MMS व्हिडिओने एकच गोंधळ; चाहत्यांना धक्का title=

Shahid Kapoor and Kareena Kapoor MMS: सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्रीचा खासगी व्हिडिओ लीक होण ही एक सामान्य गोष्ट आहे. एखाद्या अभिनेत्रीचा mms लीक होणं ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्री एमएमएस लीकमुळे वादात सापडल्या आहेत.  एमएमएस लीक प्रकरणाच्या यादीत बॉलिवूडच्या बेबोचाही सामावेश आहे.  जेव्हा करीना ही बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला (Shahid Kapoor) डेट करत होती, तेव्हा त्यांचा एका एमएमएस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या काही काळानंतर करीना आणि शाहिदचं ब्रेकअप झालं.

एकेकाळी  जेव्हा शाहिद आणि करिनाच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा होत्या. जवळ-जवळ तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. चाहत्यांसाठी हे खूपच धक्कादायक होतं, मात्र खरा गोंधळ तेव्हा उडाला जेव्हा दोन्ही स्टार्सचा एमएमएस व्हायरल झाला.  

करीनाने तिचे अफेअर कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही. शाहिदला डेट करत असतानाही तिने तिच्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या होत्या. शाहिद आणि करीना चित्रपटांमध्ये काम करताना एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा झाली, मात्र 20 सेकंदांच्या एमएमएसने हे प्रेम उद्ध्वस्त झालं. यामुळे शाहिद आणि करिना हे खूप चर्चेतही आले होते. 

 

या 20 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये करीना कपूर कपडे बदलताना दिसली आणि त्यानंतर शाहिद कपूर तिला किस करताना दिसला. हा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये दोघंही लिप लॉक करताना दिसत होते. त्या दिवसांत या व्हिडिओवरून बराच वाद झाला होता.  या खाजगी व्हिडिओचा आणि शाहिदसोबतच्या ब्रेकअपचा करीनाच्या करिअरवर कधीही परिणाम झाला नाही. आजही करीना ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आणि आता हे दोन्ही कलाकार त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात खूप खुश आहेत. करिना सैफसोबत तिचं वैवाहिक जीवन जगत आहे तर दुसरीकडे शाहिदने मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली.