मुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात

किआरा - सिद्धार्थच्या लग्नाबद्दल मोठी Update समोर; 'या' ठिकाणी कपल घेणार सप्तपदी   

Updated: Nov 3, 2022, 07:03 AM IST
मुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात title=

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding: गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. विक्की कतरिना (Vicky Kaushal Katrina Kaif) आणि रणबीर आलिया (Ranbir Kapoor Alia Bhatt) यांच्यानंतर रिचा अली (Richa Chaddha Ali Fazal) यांनी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव दिलं. या सेलिब्रिटींनंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.  

एवढंच नाही तर 'शेरशाहा' (shershah) फेम किआरा आणि सिद्धार्थच्या लग्नाबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत असतात. किआरा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या चर्चा तुफान रंगत असल्यातरी दोघांनी मात्र अद्यापही लग्न करणार असल्याची कबुली दिली नाही. (kiara advani sidharth malhotra dating)

दोघांच्या लग्नाबाबत अनेक रिपोर्ट्स समोर येत आहेत, ज्यामध्ये लग्नाच्या तारखा आणि ठिकाणाबाबत बोललं जात आहे. नुकताच मिळालेल्या अपडेटनुसार, किआरा आणि सिद्धार्थ दिल्ली किंवा मुंबईत नाही तर चंदीगड किंवा गोव्यात लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं सांगण्यात येत आहे. (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding)

एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा गेल्या महिन्यापासून लग्नाच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. यादरम्यान दोघांनी चंदीगडच्या The Oberois Sukhvilas Spa & Resorts शी संपर्क साधला. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न येथेच झालं होतं. त्यामुळे किआरा आणि सिद्धार्थ देखील याच ठिकाणी लग्न करतील की आणखी दुसरं ठिकाण शोधतील हे त्यांच्या लग्नाच्या दिवळी कळेलच...