तापमान वाढवणाऱ्या नोरा फतेहीला झालं गरम, रिक्षावाल्याकडे अजब मागणी : VIDEO

नोराने रिक्षावाल्याकडे का केली अजब मागणी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Aug 17, 2021, 07:24 AM IST
तापमान वाढवणाऱ्या नोरा फतेहीला झालं गरम, रिक्षावाल्याकडे अजब मागणी : VIDEO title=

मुंबई : मायानगरीत कोणत्याही क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असल्यास फाम मेहनतीची गरज आहे. स्वप्नांच्या या शहरात अनेकांच्या स्वप्नांना पंख मिळतात, तर काहींच्या वाट्याला मात्र निराशा येते. पण अभिनेत्री नोरा फतेहीने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्तापित केल आहे. आज तिची तुलना प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होते. नोरा कायम तिच्या डान्सने चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावरील तिचे डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. नोरा तिच्या डान्स अदांमुळे चर्चेत असते. 

पण आता नोरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा एका रिक्षावाल्याकडे अजब मागणी करताना दिसत आहे. ती रिक्षावाल्याला मला इंग्लंडला सोडाल का? असं विचारताना दिसत आहे. नोराच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून एका पेक्षाएक कमेन्ट येत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'गर्मी' गाण्याच्या माध्यमातून तापमानात वाढ करणारी नोरा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नोरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नोरा रिक्षावाल्याला म्हणते, 'भैया मुंबईत फार गरम होत आहे. मला इंग्लंडला सोडाल का?'

नोराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच 'भुज:द प्राइड ऑफ इंडिया'च्या माध्यमातून भेटीस येणार आहे. 'दिलबर' आणि 'गर्मी' या गाण्यांमुळे नोराच्या लोकप्रियतेत वाढ झाली.