परदेशात कपडे विकतेय बॉलिवूड अभिनेत्री

सोशल मीडियावर व्हायरल होतोय तिचा व्हिडिओ 

Updated: Jun 12, 2019, 04:43 PM IST
परदेशात कपडे विकतेय बॉलिवूड अभिनेत्री title=

मुंबई : नृत्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात नोरा फतेही यशस्वी झाली आहे. नोरा चर्चेत असते ते म्हणजे तिच्या अनोख्या नृत्यकौशल्यामुळे. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही तिला चांगलीच लोकप्रियता आहे. अशा या अभिनेत्रीवर चक्क कपडे विकण्याची वेळ का बरं आली असावी? 
सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती परदेशात म्हणजेच बँकॉकमध्ये कपडे विकताना दिसत आहे. नोराचा हा अंदाज अनेकांसाठी नवा असून, तो तितकाच लक्षवेधी ठरत आहे. मोठ्या विनोदी अंदाजात तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Catch me at your nearest street market selling shorts. LOL @rajitdev

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

नोराच्या या व्हिडिओवर अनेकांनीच कमेंटी केल्या आहेत. पण, त्यावर मात्र तिने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. बिग बॉसच्या माध्यमातून नोरा प्रकाशझोतात आली होती. ‘बाहुबली’, 'स्त्री’ आणि ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांतून तिने आयटम साँग केले आहेत. अनोखी नृत्यशैली आणि मादक अंदाजासाठी ती ओळखली जाते.