महानायक अमिताभ बच्चन यांचं खरं नाव अद्याप कोणालाही नाही माहित

महानायक, बिग बी अशा अनेक नावांनी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. 

Updated: May 31, 2021, 11:12 AM IST
महानायक अमिताभ बच्चन यांचं खरं नाव अद्याप कोणालाही नाही माहित title=

मुंबई : महानायक, बिग बी अशा अनेक नावांनी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. आपल्या अभिनयाने संपूर्ण जगाला वेड लावणारे अमिताभ बच्चन यांचं खरं नाव अद्याप अनेकांना माहिती नाही. अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीचं नाल 'इंकलाब' असं होतं. बिग बींनी एक किस्सा सांगितला होता. त्यांचा जन्म 1942 सालचा तेव्हा तेव्हा भारतात 'क्विट इंडिया मूवमेंट' आक्रमक झाली होती.  तेव्हा बिग बी आई तेजी यांच्या पोटात होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

याच दरम्यान तेजी बच्चन यांनी पाहिलं इंकलाब जिंदाबादच्या घोषणेस प्रारंभ झाला, तेजीसुद्धा घराबाहेर पडल्या आणि घोषणाबाजी करत सर्वांसोबत पुढे जात राहिल्या. बिग बींचे वडील हरीवंश राय बच्चन घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. तेजी घरात नाहीत. ते घाबरले. अशा अवस्थेत तेजी कोठे गेल्या. त्यानंतर तेजी यांना घरी आणलं. 

त्यावेळी हरीवंश राय बच्चन त्यांच्या मित्रासोबत होते. तेव्हा त्यांचे मित्र म्हणाले जर मुलगा झाला तर त्यांचं नाव 'इंकलाब' असं ठेवायला हवं. मित्राने दिलेला सल्ला अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांना पटला. पण महान साहित्यिक सुमित्रांदन पंत आणि त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी मुलाचे नाव अमिताभ ठेवले.