अभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा

Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce :  अभिषेक बच्चननं केलेल्या कृत्यानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरु झाली घटस्फोटाची चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Dec 3, 2023, 05:24 PM IST
अभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce : बॉलिवूडचं बच्चन कुटूंब हे नेहमीच चर्चेत असतं. कधी त्यांच्या फोटोमुळे कोणत्या कार्यक्रमामुळे तरी कधी कोणत्याही छोट्या कामामुळे. सध्या बच्चन कुटूंब चर्चेत असण्याचं कारण हे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. गेल्या अनेक काळापासून ऐश्वर्या आणि अभिषेतकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. या चर्चा सुरु होताचं त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या सगळ्यात अभिषेक बच्चननं केलेल्या कृत्यानं ते खरंच घटस्फोट घेणार आहेत की काय किंवा त्यानं न कळत घटस्फोटाची हिंट दिली आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर नेटकरी अभिषेकचे फोटो शेअर करत त्यावर कमेंट करत आहेत. या फोटोला शेअर करत काही नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे की 'नुकत्याच एका कार्यक्रमात अभिषेकनं हजेरी लावली होती. त्यावेळी अभिषेकनं अंगठी घातली नव्हती. आता पर्यंत त्याला कधीच लग्नाची अंगढी काढलेली कोणी पाहिलं नाही. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आमचा विश्वास बसत चालला आहे.' तर काही नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन नेटकऱ्यानं कमेंट केली की नक्की काय सत्य आहे आणि काय असत्य हे माहित नाही. पण मी नेहमी विचार करतो की बच्चन कुटूंबात घटस्फोट अशक्य आहे. याची अपेक्षा नव्हती.

Abhishek isn't wearing his wedding ring anymore in his recent appearances, up until now he has always worn it.
byu/vinnyy19 inBollyBlindsNGossip

हेही वाचा : वाद विसरून पुन्हा एकत्र आले कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर; 'बुआ' म्हणाली- 'मला आधीच...'

अमिताभ यांचा उल्लेख करत नेटकरी म्हणाला, जो पर्यंत अमिताभ हयात आहेत, तो पर्यंत ते याची परवानगी देणार नाहीत. दुसरा नेटकरी म्हणाला, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय बच्चन कुटूंब हे शक्तिशाली आहेत. त्यांच्याशिवाय हे कुटुंब काही राहणार नाही. तिसरा नेटकरी श्वेता बच्चनचा उल्लेख करत म्हणाला, जमल्यास याला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवा आणि कॅमेऱ्याच्या समोर एक आनंदी कुटुंब असं ठेवा. श्वेतानं देखील तसंच केलं. ती जवळपास दशकपासून तिच्या नवऱ्यासोबत राहत नाही. ती आता वडिलांच्या पैशांवर आई- वडिलांसोबत राहते. तरी देखील ती अजूनही तिच्या नवऱ्याचं आडनाव लावते आणि अशी वावरते जणू सगळं काही ठीक आहे. 

netizens claims Abhishek Bachchan just coinfirms his divorce with Aishwarya Rai

ऐश्वर्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबाची अनुपस्थिती

ऐश्वर्यानं नुकताच म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी तिचा 50 वा वाढदिवसात साजरा केला. त्यावेळी ऐश्वर्या या कार्यक्रमात तिची आई बृंदा राय आणि आराध्या बच्चन उपस्थित होती. त्यावेळी बच्चन कुटूंबातील कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती. याशिवाय ऐश्वर्याचं इतरं बच्चन कुटुंबाशी पटत नाही असं देखील म्हटलं होतं.