अनुष्काच्या ‘परी’चा खतरनाक ट्रेलर, विराट झाला अवाक

अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. अनुष्काने याआधीच या सिनेमातील भीतीदायक भूमिकेची झलक दाखवली आहे. आता तर तिचा पती विराट कोहली हा ट्रेलर पाहून थक्क झालाय. त्याने स्वत: ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 15, 2018, 06:09 PM IST
अनुष्काच्या ‘परी’चा खतरनाक ट्रेलर, विराट झाला अवाक title=

मुंबई : अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. अनुष्काने याआधीच या सिनेमातील भीतीदायक भूमिकेची झलक दाखवली आहे. आता तर तिचा पती विराट कोहली हा ट्रेलर पाहून थक्क झालाय. त्याने स्वत: ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केलाय. 

काय म्हणाला विराट?

‘माझ्या एकाच आणि एकुलतीचा कधीही न पाहिलेला अवतार पाहण्यासाठी मी फार उत्सुक झालो आहे’. 

अनुष्का खतरनाक लूक

अनुष्का शर्माच्या या सिनेमाने एक स्पष्ट केलंय की, हा सिनेमा कमजोर हृदय असलेल्यांसाठी नक्कीच नाहीये. हॉरर आणि थ्रिलर जॉनरच्या या सिनेमातील अनुष्काची भूमिका चांगलीच भीतीदायक झाली आहे. या सिनेमात अनुष्कासोबत प्रसिद्ध बंगाली अभिनेता परमब्रती चॅटर्जी बघायला मिळत अहे. त्याने याआधी ‘कहाणी’ सिनेमात पोलिसाची भूमिका साकारली होती. ‘परी’ हा सिनेमा येत्या २ मार्चला रिलीज होणार आहे. 

अनुष्काची निर्मिती

‘परी’ हा एक हॉरर सिनेमा असून या सिनेमाचं पूर्ण टायटल ‘परी: नॉट ए फेरी टेल’ असं आहे. अनुष्का शर्माचं प्रॉडक्शन हाऊस ‘क्लीन स्टेट फिल्म्स’चा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी ‘एनएच १०’ आणि ‘फिलोरी’ हे सिनेमे निर्मित केले होते.