मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सीरियल किसर या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत रोमँटिक सीन्स केले आहेत. पण एकदा त्याच्यासोबत असं काही घडलं की, किसिंग सीन करताना तो स्वतः लाजेने लाल झाला. खरं तर, 'अजहर' चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाने कट केल्यानंतरही नर्गिस फाखरी त्याला किस करत राहिली, ज्यानंतर इमरानला शॉक बसला.
खरं तर, ही गोष्ट २०१६ सालची आहे. जेव्हा इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी यांचा 'अजहर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'बोल दो ना जरा' गाण्याचं शूटिंग सुरू होतं. या गाण्याचा एक मेकिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नर्गिस आणि इमरान किसिंग सीनबद्दल बोलताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये नर्गिस फाखरी म्हणते, 'मला इमरानला पाच वेळा किस कराव लागलं आणि त्यासाठी मी एक्स्ट्रा चार्ज घेणार होते. कारण ते माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्येच नव्हतं. ती पुढे म्हणाली, मला माहित आहे की, इम्रानलाही याबद्दल खूप आनंद झाला होता. जरी त्याने अशाप्रकारे एक्टिंग केली आणि म्हणाला, 'हे भगवान, मला खरोखर काय होत आहे हे माहित नाही.' तो खरोखर खूप लबाड आहे आणि त्याला ते आवडतं.
कट ओरडूनही नर्गिस किस करत राहिली
मेकिंग व्हिडिओमध्ये इमरान आणि नर्गिस फाखरी यांचा किसिंग सीन दिसत आहे. दिग्दर्शकाने कट बोलल्यानंतरही, नर्गिसने इमरानला घट्ट पकडलं आणि किस करण सुरूच ठेवलं, ज्यामुळे तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूचे क्रू मेंबर्सदेखील जोरात हसू लागले