नाना पाटेकर यांच्या मुलाची पर्सनॅलिटी अनेक सुपरस्टार्सना टाकतेय मागे...

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर सध्या चर्चेत आला आहे. त्याची साधी, पण युनिक पर्सनॅलिटी पाहून चाहत्यांना तो प्रेक्षकांमध्ये भूरळ घालत आहे. काही चाहते म्हणतात की, मल्हारची पर्सनॅलिटी आणि अभिनय कौशल्य भविष्यात अनेक सुपरस्टार्सना मागे टाकेल.   

Intern | Updated: Dec 17, 2024, 03:43 PM IST
नाना पाटेकर यांच्या मुलाची पर्सनॅलिटी अनेक सुपरस्टार्सना टाकतेय मागे... title=

नाना पाटेकर यांचा मुलगा हुबेहुब त्यांच्या सारखाच दिसतो. त्याचा साधेपणा, संयमित स्वभाव आणि डोळ्यात दिसणारी कणखरता लोकांना आकर्षित करत आहे. मल्हारचे वडील नाना पाटेकर हे एक हुशार अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नानांनी आपल्या करिअरमध्ये अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत आणि त्यांना पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीची अनोखी शैली आजही लोकप्रिय आहे, ज्यामुळे त्यांचे चाहते लहानांपासून वृद्धांपर्यंत आहेत.

मल्हार पाटेकरचे शिक्षण आणि करिअर  
मल्हारने मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि नंतर वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच त्याला चित्रपटसृष्टीत काम करण्याची आवड होती. सुरुवातीच्या काळात मल्हार प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता, पण नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यातील वादामुळे मल्हारला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. 

यानंतर, मल्हारने राम गोपाल वर्मा यांच्या 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आज तो स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे, ज्याचे नाव त्याने आपल्या वडिलांच्या नावावर ठेवले आहे- नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस. 

नानांचे कुटुंब आणि मल्हारचे आई-वडील  
नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. सध्या दोघेही वेगळे राहतात. मल्हार त्याच्या आईच्या अत्यंत जवळ आहे. 

मल्हारने चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याचा साधेपणा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील ठामपणा चाहत्यांना खूप आवडतो. अशा परिस्थितीत चाहते त्याला पुढे अभिनयात पाहण्याची अपेक्षा करत आहेत.