नाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक...

मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे.

Updated: Nov 8, 2022, 11:23 PM IST
नाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक... title=
Nana Patekar will once again make a comeback in the film world nz

Nana patekar Come back : नाना पाटेकर प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनात घर केलं आहे. त्यांच्या प्रसिद्ध डॉयलॉगवार आजही अनेक लोक मिमिक्री करतात. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीतून गायब आहे. त्यांना अनेकदा राजकीय निर्णयांवर प्रतिक्रिया देताना पाहिलं जातं. ते त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत ही येतात. ते शेवटचे 2020 मध्ये इट्स माय लाइफ या चित्रपटात दिसला होता. मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे. (Nana Patekar will once again make a comeback in the film world nz)

हे ही वाचा - पाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल

नानांची वेब सीरिजसाठी हातमिळवणी 

नाना पाटेकर यांनी एका वेब सीरिजसाठी प्रकाश झा यांच्याशी हातमिळवणी केली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर तो प्रकाश झा यांच्या लाल बत्ती या वेबसीरिजमधून पुनरागमन करणार आहे. या वेब सिरीजद्वारे नान पाटेकर ओटीटीवर पुनरागमन करणार आहेत. ही एक सामाजिक आणि राजकीय वेब सिरीज असणार आहे. प्रकाश झा आणि नाना पाटेकर दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी नाना प्रकाश झा यांच्या पॉलिटिक्समध्ये रणबीर कपूर आणि कतरिना कैफसोबत दिसले होते.

हे ही वाचा - कसं मिळालं अमिताभ यांना 'बच्चन' हे आडनाव? खुद्द बीग बींनी सांगितला तो किस्सा... पाहा Video

ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत

वेब सीरिजच्या निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी मेघना मलिकची निवड केली आहे. मेघना हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. यापूर्वी ती मिर्झापूर, अरण्यक आणि बंदिश डाकू यांसारख्या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. मेघना शेवटची 'अनेक' या चित्रपटात दिसली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत ती नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

हे ही वाचा - प्रेगनेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...

MeToo वर आरोप

तनुश्री दत्ताने यापूर्वी MeToo चळवळीदरम्यान एका चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तनुश्रीने  2022  मध्ये दावा केला होता की, बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकर यांनी तिला लक्ष्य केले होते. नाना पाटेकर यांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी यूजर्सनी त्यांना खूप ट्रोल देखील केले.