समांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्...

Naga Chaitanya left theater because of samantha : नागा चैतन्यनं एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेला असताना समांथा आणि विजय देवरकोंडाला रोमान्स करताना पाहताच तो तिथून निघून गेला... नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण एकदा पाहाच...

दिक्षा पाटील | Updated: Aug 28, 2023, 05:33 PM IST
समांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्... title=
(Photo Credit : Social Media)

Naga Chaitanya left theater because of samantha : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही सध्या त्यांच्या 'कुशी' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिची आणि अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर याआधी समांथा रुथ प्रभू ही कोणासोबत चांगली दिसायची असा प्रश्न विचारला. तर सगळ्यांच्या लक्षात लगेच तिचा पूर्वाश्रमीचा पती म्हणजेच नागा चैतन्य दिसतो. 2021 मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांविषयी चर्चा गेल्या अनेक दिवसांपूर्वी थांबल्याच होत्या. तर आता पुन्हा एकदा त्यांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

समांथा आणि नागा चैतन्य या दोघांच्या चर्चा सुरु होण्याचं कारण हा तिचा आगामी चित्रपट 'कुशी' आहे. नागा चैतन्यनं नुकत्याच एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटाच्या इंटरव्हलदरम्यान, समांथाच्या 'कुशी' या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. या चित्रपटात समांथानं विजय देवरकोंडासोबत काम केलं असून त्या दोघांचे अनेक रोमॅन्टिक सीन आहेत. नागा चैतन्य त्याचा पूर्वाश्रमीच्या पत्नीला एका दुसऱ्या अभिनेत्यासोबत असे सीन करताना पाहू शकला नाही. त्यानं थेट चित्रपट मध्यांतरानंतर सोडत बाहेर पडल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : दुर्देवाने फक्त आईच पूर्णपणे प्रेम देत होती; आई-वडिलांच्या लग्नाविषयी बोलताना गश्मीर महाजनी भावूक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समांथा आणि नागा चैतन्यविषयी बोलायचे झाले तर त्या दोघांची जोडी ही प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. त्यांची जोडी ही कपल गोल ठरली होती. मात्र, अचानक त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, गेल्या वर्षी त्यांनी समांथाला मायोसिटीस या आजाराचे निदान झाल्याचे समोर आले होते. समांथा उपचार करत होती त्यावेळी ती शाकुंतलम या चित्रपटाची डबिंग करत होती. त्यानंतर तिनं विजयसोबत असलेला खुशी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. समांथानं सध्या चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला असून ती स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. यामुळेच समांथानं तिला काही प्रोजेक्ट्साठी आधीच मिळालेल्या काही आगाऊ पेमेंट देखील निर्मात्यांना परत केल्या आहेत. तर दुसरीकडे ती त्यातून वेळ काढून खुशी या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन करताना देखील दिसते.