मुंबई : मॅडनेस मचायेंगे इंडिया को हंसाएंगे हा शो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी देखील या शोचा एक भाग असणार आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, 'मॅडनेस मचायेंगे, इंडिया को हसाएंगे' हा कार्यक्रम 9 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मुनव्वर फारूकी होता पहिला गेस्ट
'मॅडनेस मचायेंगे, इंडिया को हसाएंगे' या कार्यक्रमाचा पहिला गेस्ट हा बिग बॉस सीझन 17चा विनर मुनावर फारूकी होता. तर हर्ष गुजराल त्याच्या शोचा ओपनर म्हणून मुनव्वरच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसला आहे. हर्ष आणि मुनव्वर दोघंही एकत्र'यूपी वर्सेस डोंगरी' नावाचा स्टँड-अप अभिनय करताना दिसले, जे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. हा शो शनिवार आणि रविवार, 9 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता सोनीवर प्रसारित झाला आहे..
मात्र यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो हेमांगी कवी विषयी अशी गोष्ट बोलताना दिसतोय, जे ऐकून हेमांगीच्या चाहत्यांनाही धक्का बसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुनव्वर बोलतोय, ''दादी! हेमांगी. मला माहितीये इथे हेमांगी कवी आलीये. यावर हेमांगी म्हणजे, कसं? यावर मुन्नवर म्हणतो, ईथे बाहेर चार महागड्या कार उभ्या होत्या आणि त्यामध्ये एक रिक्षा उभी होती. मात्र तु जेव्हा आता तोंड धुवून आली होतीस ना तेव्हा तु खूप चांगली दिसत होती. तो मेकअप होता? यावर हेमांगी म्हणते नाही. पुढे मुन्नवर म्हणतो, मेकअप असो वा नसो मीतर तुला असंही ओळखत नाही.''
सध्या मुनव्वरचं हे वक्तव्य चांगलच चर्चेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्वत: हेमांगीने तिच्या इन्स्टावर स्टोरीमध्ये शेअर केला होता. तर हा व्हिडीओ पाहताच मुनव्वर मात्र चांगलाच ट्रोल होतोय.
'मॅडनेस मचायेंगे, इंडिया को हसाएंगे' हा कार्यक्रम 9 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा शो चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात हेमांगी व्यतिरिक्त इंदर साहनी, परितोष त्रिपाठी, हर्ष गुजराल, गौरव दुबे, केतन सिंह, हेमांगी कवि, कुशल बद्रिके, अंकिता श्रीवास्तव, स्नेहिल मेहरा हे कलाकारही हसवताना दिसत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.