मुंबई : एका तालुक्याची नाही अख्ख्या देशाची गोष्ट... म्हणत मुळशी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने फक्त प्रेक्षकांच्या जोरावर कोट्या रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाने सगळ्यांचीच मन जिंकली आहेत.
मुळशी पॅटर्न या सिनेमाने 3 दिवसांत 5 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या सिनेमाने 11 दिवसांत 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाला शहरात आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाने ग्रामीण प्रेक्षकांबरोबरच शहरी प्रेक्षकांच देखील लक्ष वेधलं आहे.
पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे ३५८ हून अधिक चित्रपटगृहात ७५५ पेक्षा जास्त शो होते, सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा २.० चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाही ‘मुळशी पॅटर्न’च्या लोक्प्रीयेतेवर परिणाम झाला नाही.
हा सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाची जोरदार चर्चा झाली. तसेच अनेकांनी टीका देखील केली. वाढत्या शहरीकरणासाठी जमिनी बळकावल्या जातात या वादावर हा सिनेमा भाष्य करतो.
जिल्ह्यातील मूळशी तालुक्यात जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री करून शहरांची हद्दवाढत आहे. त्या वाढत्या शहरीकरणातील जमिनीच्या वादावर हा सिनेमा भाष्य करतो. ही केवळ एका तालुक्याची गोष्ट नाही, अख्या देशाची गोष्ट असल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं.