....म्हणून, पत्र लिहित साराने 'त्यांना' कॉफीवर बोलावलं

 सारा 'केदारनाथ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Updated: Dec 5, 2018, 01:33 PM IST
....म्हणून, पत्र लिहित साराने 'त्यांना' कॉफीवर बोलावलं title=

मुंबई : कलाविश्वाच्या या अनोख्या आणि झगमगमाऱ्या दुनियेत आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज असणाऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री सारा अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा 'केदारनाथ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ती विविध कार्यक्रमांना हजेरी लावत माध्यमांनाही मोठ्या आत्मविश्वासाने सामोरी जात आहे. इतकत नव्हे तर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहता तिने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सुरुवातही केली आहे. 

एखाद्या कलाकारासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी तिला मिळतच आहे. ज्यामध्ये माध्यमं आणि छायाचित्रकारांची महत्त्वाची भूमिका आहे. खुद्द सारालाही ही बाब मान्य आहे आणि म्हणूनच तिने एक पत्र लिहित माध्यमं, छायाचित्रकारांचे मनापासून आभार मानले आहेत. इतकत नव्हे तर, त्यांना कॉफी पिण्यासाठी आमंत्रितही केलं आहे. 

आपल्याला अगदी सुरुवातीच्याच दिवसांमध्ये मिळालेला हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असून, आतापर्यंत काढलेल्या सुरेख फोटोंसाठी, त्यांच्या कॅप्शनसाठी तिने त्यांचे आभार मानले आहेत. तिचा हा अंदाज संपूर्ण छायाचित्रकार वर्गातही चर्चेचा विषय ठरला असून, करिअरच्या दृष्टीनेही याचा तिला फायदा होणार आहे हे खरं.