पुण्यात कार्यक्रमासाठी गेलेली मुग्धा प्रथमेशला करतेय मिस! फोटो शेअर करत म्हणाली...

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. त्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून मुग्धा प्रथमेशपासून लांब राहु शकत नाही, असं दिसू लागलं आहे. पोस्ट शेअर करत मुग्धानं प्रथमेशला मिस करत असल्याचं सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 25, 2023, 03:31 PM IST
पुण्यात कार्यक्रमासाठी गेलेली मुग्धा प्रथमेशला करतेय मिस! फोटो शेअर करत म्हणाली... title=
(Photo Credit : Prathamesh Umesh Laghate Instagram)

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मधून घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. ते दोघे सोशल मीडियाावर सक्रिय असल्याचे दिसते. त्या दोघांनी जेव्हापासून त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे, तेव्हापासून त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सतत चर्चेत येत आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता मुग्धानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रथमेशला मिस करत असल्याचे जाहिरपणे सांगितले आहे. 

मुग्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुग्धानं जेवणाच्या ताटाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मुग्धानं कॅप्शन दिलं की " तुम्हाला प्रचंड मिस करते." यावेळी मुग्धानं फक्त प्रथमेश नाही तर बहीण मृदुला वैशंपायन आणि विश्वजीत जोगळेकर या मित्राला देखील टॅग केलं आहे. मुग्धा ही सध्या पुण्यात एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली आहे. 

Mugdha Vaishampayan missing Prathamesh Laghate shares post

‘सा रे ग म प’नंतर त्यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम एकत्र केले आहेत आणि अजूनही करत आहेत. त्या व्यतिरिक्त अनेकदा ते दोघं एकत्र दिसतात. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले. तेव्हा पासून त्या दोघांनी एकत्र यावं अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. दरम्यान, ते दोघं एकत्र कसे आले याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. सारेगमप लिटिल चॅम्प्समुळे त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरु झाले. कार्यक्रमांमुळे त्यांचं भेटणं व्हायचं आणि त्या दरम्यानच त्या दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. एकदा त्यांच्या कार्यक्रमाची तालीम सुरु होती. त्यामध्ये त्यांच्यात आवांतर गप्पाही होत होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला विचारलं. तो तिला हे विचारणार हे तिला अपेक्षितच होतं. मुग्धानेचं उत्तर काय असेल हे प्रथमेशला माहीत होतंच पण तरीही मुग्धाने त्याला होकार द्यायला तीन-चार दिवस लावले. तिने एक दिवस त्याला भेटायला बोलावलं आणि त्याला होकार दिला. गेली साडेतीन – चार वर्षं ते रिलेशनशिपमध्ये आहेत. 

हेही वाचा : वादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; 'आदिपुरुष'चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?

प्रथमेश आणि मुग्धा एकत्र आहेत यानं त्यांच्या घरच्यांना अंदाज होताच. पण अधिकृतपणे रिलेशनशिपविषयी मुग्धाच्या घरी तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पाच-सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी त्यांच्या घरच्यांना सांगितलं. याविषयी बोलताना मुग्धा म्हणाली की "आम्ही दोघांनी एकाच दिवशी, एकाच वेळी आमच्या घरी रिलेशनशिपविषयी सांगितलं. जर आणखीन थोडा जरी उशीर केला असता तर आमच्या घरच्यांनीच पुढाकार घेऊन तुमचं काय चाललंय? असं विचारलं असतं."

तर प्रथमेश म्हणाला, “आम्ही एकमेकांच्या घरच्यांना लहानपणापासून ओळखतो. आमच्या नात्याबद्दल घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया अगदी साधी होती. निश्चितच त्यांना आनंद झाला. आता लवकरच पुढील गोष्टी ठरतील.”