Lockdown : माधुरीने घुंगरू बांधून शास्त्रीय नृत्यावर धरला ठेका

सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत अभिनेत्री माधुरी दीक्षितने छंद जोपासला आहे .  

Updated: Apr 21, 2020, 06:59 PM IST
Lockdown : माधुरीने घुंगरू बांधून शास्त्रीय नृत्यावर धरला ठेका title=

मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय अनेक नृत्यप्रेमींच्या प्रेरणास्थानी माधुरी आहे. कथक नृत्यात पारंगत असलेल्या माधुरीने लॉकडाऊन काळात घुंगरू घालून कथकवर ठेका धरला आहे. तिने आपल्या नृत्य सादरीकरणाचे काही व्हिडिओ सोशल मीडिया शेअर केले आहेत. सध्या तिचे हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार घरात राहून स्वत:चे छंद जोपासत आहेत. तर माधुरी देखील कथक नृत्याचा रियाझ करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What better way to spend time at home than doing something you love so much! Here's the second session of my Kathak riyaz

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

इन्स्टाग्रामवर आपल्या नृत्याचा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'घरात वेळ व्यतीत करण्याचा नृत्याशिवाय दुसरा मार्ग असूच शकत नाही' असं लिहलं आहे.  कथक रियाझाचा हा माझा दुसरा सत्र असल्याचं देखील तिने सांगितले आहे. #RiyazOverCall असं नाव तिने रियाझाला दिलं आहे. 

इंटरनेच्या माध्यमातून ती कथक नृत्याचे धडे गिरवत आहे. नृत्या करताना तिचे अंगभाव, मुद्रा, नृत्य सैंदर्य इत्यादी गोष्टी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिमध्ये इंटरनेच्या माध्यमातून  सोशल डिस्टसिंगचे नियम तिने पाळले आहेत.