सा रे ग म प: ट्रोलर्सवर भडकली मृण्मयी; दिलं सडेतोड उत्तर

पाच परिक्षकांवरूनही मीम्स व्हायरल 

Updated: Jul 5, 2021, 12:57 PM IST
सा रे ग म प: ट्रोलर्सवर भडकली मृण्मयी; दिलं सडेतोड उत्तर  title=

मुंबई : झी मराठी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाचे नवीन पर्व दोन आठवड्यांपूर्वी सुरु झाले. या पर्वाचं वेगळेपण म्हणजे 'सा रे ग म प' च्या आधीच्या पर्वाचे लिटिल चॅम्प आता परिक्षक बनले आहे.  या पर्वामध्ये लिटिल चॅम्प्सच्या गाण्याचं परिक्षण करण्याची जबाबदारी रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत आहे.

लिटिल चॅम्प परिक्षण म्हणून आपली भूमिका साकारत असताना अनेक मिम्स व्हायरल झाले. पाचही परिक्षकांच्या शैलीवर तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीच्या शैलीची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल झालेत. असं असतानाच मृण्मयीने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Shyam Raut (@rohitshyamraut)

सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीला पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अनेकांनी यासंदर्भातील मिम्सही शेअर केलेत. अनेकजण सोशल नेटवर्किंगवरुन मृण्मयी सूत्रसंचालन करताना ओव्हर अ‍ॅक्टींग करते अशी टीका केलीय. तशी मृण्मयी सोशल नेटवर्किंगवर फार अ‍ॅक्टीव्ह आहे. ती अनेकदा कार्यक्रमाचे प्रोमो वगैरे शेअर करत असते.

मृण्मयीने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर 

मृण्मयीच्या अशाच एका पोस्टवर एका चाहत्याने सा रे ग म प लिटिल चॅम्पसंदर्भातील कमेंट केली. ‘समोर बसलेले जज आणि अँकर खूपदा वा वा ओरडतात याला ओव्हर अ‍ॅक्टींग म्हणायची का?,’ असं या चाहत्याने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करुन म्हटलं. या कमेंटवर मृण्मयीने सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?,” असा प्रश्न मृण्मयीने तिला ट्रोल करु पाहणाऱ्या या व्यक्तीला केला.

अनेकांनी मृण्मयीचं म्हणणं बरोबर असल्याचं मत या कमेंटखाली व्यक्त केलं आहे. या पोस्टवर मृण्मयी चांगलं काम करत असून तिने रोज एका परिक्षकाकडून गाणं गाऊन घ्यावं अशी इच्छा एकाने व्यक्त केली आहे.