कलाकार- क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पहवा, सुप्रिया पाठक
दिग्दर्शक - लक्ष्मण उतेकर
कालावधी - 2 तास 13 मिनिटं
स्टार - 4 स्टार
श्वेता वाळंज, झी मीडिया, मुंबई : सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर 'मीमी' चित्रपटाची. चित्रपटाची कथा सरोगेसी भोवती फिरताना दिसत आहे. एक काळ होता जेव्हा भारत सरोगेसीसाठी एक अड्डा ठरला होता. 'मीमी' चित्रपटात हाच मुद्दा दिग्दर्शकाने उचलून धरला आहे. याआधी मराठीमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचं नाव होतं 'मला आई व्हायचं आहे'... 'मीमी' चित्रपटाला याचा अपडेट व्हर्जन म्हणायला हरकत नाही.
'मला आई व्हायचं आहे' चित्रपट पुर्णपणे भावनिक होता. पण 'मीमी' चित्रपटात मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. एखाद्या गंभीर परिस्थितीत एक कॉमेडी डायलॉग येतो आणि परिस्थिती पुर्णपणे बदलून जाते. चित्रपटात क्रितीने तिच्या अभिनयाने सर्वांना थक्क केलं. त्यानंतर पंकज त्रिपाठीच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर शब्द अपूरे पडतील.
एखाद्या गंभीर परिस्थितीत पंकजच्या डायलॉगमुळे हसू आवरणार नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि डायलॉगला काही तोडचं नाही, त्यात साथ मिळाली ती म्हणजे संगीतकार ए. आर रेहमान यांच्या संगीताची.
कशी आहे कथा?
एका परदेशी जोडप्याला मुलं होत नाही, त्यामुळे सोरोगेसीच्या माध्यमातून मुलं मिळवण्यासाठी ते भारतात येतात. तेव्हा त्यांची ओळख होते पंकज त्रिपाठीसोबत. पंकजला त्यांची अडचण कळते आणि तो त्यांची मदत करण्यार तयार होतो. त्यांनंतर एका शोमध्ये त्यांनी भेट होते क्रितीसोबत. तेव्हा त्या परदेशी जोडप्याला क्रिती त्यांच्या मुलासाठी पसंत येते.
राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या मुलीचं (क्रिती) बॉलिवूडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्वप्नांची नगरी मुंबईत यायचं असतं. पण त्यासाठी हवे असतात पैसे. तेव्हा पंकजचा प्रवासा सुरू होतो तो म्हणजे क्रितीला सरोगेसी आई होण्यासाठी तयार करण्याचा.
पंकजच्या भाषेत सांगायचं झालं तर 'बिज और खेत किसी और का बस जमीन तुम्हारी' त्याच्या बदल्यात क्रिती मिळाणार होते पैसे. त्यानंतर तिचं एकचं स्वप्न होतं ते म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनत्री दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा सर्वांना मागे टाकत क्रिती रणवीर सिंगची मस्तानी व्हायचं.
पैसे मिळाणार असल्यामुळे क्रिती तयार देखील होते. पण त्यानंतर चित्रपटात एक वेगळा ट्विस्ट येतो. क्रितीच्या वाट्यात अनेक अडचणी येतात. पण हॅप्पी एन्डिंगने चित्रपटाचा शेवट होतो. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटात बोल्ड सीन नाहीत त्यामुळे कुटुंबासोबत हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.