Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच - क्राईम ब्रांच

राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टी अडचणीत येणार का? 

Updated: Jul 28, 2021, 11:44 AM IST
Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच - क्राईम ब्रांच  title=

मुंबई : अश्लिल फिल्म प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राच्या बँकेचे व्यवहार आणि बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे. याकरता मुंबई पोलिसांनी क्राइम ब्रांचच्या फॉरेन्सिक परीक्षकाला नियुक्त केलं आहे. क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि कंपनीशी संबंधीत अन्य काही व्यक्तींच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे. (Raj Kundra Case : Crime Branch clarified no clean chit to Shilpa Shetty on Pornography Case ) 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राचे बँक खाते आणि त्याचे वियान इंडस्ट्रीचे संयुक्त खाते आज तपासले जाणार आहे. ज्यामुळे शिल्पा शेट्टी देखील अडचणीत येऊ शकते. या कंपनीचा अश्लिल पॉर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित आहे का? यावर चौकशी सुरू आहे. तसेच राज कुंद्राच्या अकाऊंटमध्ये परदेशातून पैसे जमा झाल्याची नोंद आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चौकशीचा भाग आहे. प्रत्येक बँक खात्याची चौकशी होणार त्यामुळे शिल्पा शेट्टीला तुर्तास क्लीनचीट नाही. तसेच आमचा कुणाच्या खासगी खात्याशी संबंध नाही. क्राईम ब्रांचने 19 जुलै रोजी राज कुंद्राला अश्लिल पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केली. आता राज कुंद्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

या कारणांमुळे शिल्पावर संशय 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं PNB बँकेतील खातं संशयाच्या घेऱ्यात आहे. राज कुंद्रा या अकाऊंटमध्ये पॉर्नोग्राफी व्यवसायातील पैसे जमा करत असे. हे अकाऊंट शिल्पा-राज यांचं जॉईंट अकाऊंट असल्यामुळे शिल्पादेखील या पैशाचा वापर करत असे. 

तसेच या व्यवसायातील कमाईवरून शिल्पा शेट्टीने गुंतवणूक करणे तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये इन्वेस्ट करणे या गोष्टी देखील केल्या आहेत. त्यामुले संशयाची सुई शिल्पा शेट्टीच्या अवती भवती देखील फिरत आहे. 

तसेच शिल्पा यावर म्हणते की, तिला राज कुंद्राच्या या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नव्हती.या प्रकरणात या दोघानांही फसवलं जात आहे. शिल्पाने राजच्या बहिणीचा नवरा प्रदीप बख्शीला या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हटलं आहे.