'पुष्पा नाम सुनकर flower समझे क्या, फ़ायर है मैं', या डायलॉगमागे कोणाचा हात? हादरवणारा खुलासा

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सची भुरळ पडली.

Updated: Jan 21, 2022, 03:52 PM IST
'पुष्पा नाम सुनकर flower समझे क्या, फ़ायर है मैं', या डायलॉगमागे कोणाचा हात? हादरवणारा खुलासा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पुष्पा- द राईज' या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले, नवे विक्रम रचले आणि लोकप्रियतेचं शिखर गाठलं. कलाकारांचा दमदार अभिनय या विविधभाषी चित्रपटाच्या यशामागचं गमक ठरला. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सची भुरळ पडली. (Pushpa the rise)

'पुष्पा नाम सुनकर flower समझे क्या, फ़ायर है मैं', हा डायलॉग आठवतोय का? आठवत असेल तर हा डायलॉग नेमका इतका लोकप्रिय झालाच कसा, याचा अंदाज तरी बांधलाय? 

'पुष्पा' या चित्रपटाचं हिंदी चित्रपट पाहताना अल्लू अर्जुन भलताच भावतो. त्याच्या आवाजाची फेक अतिशय खरी आणि तितक्याच ताकदीची वाटते. 

तुम्हाला माहितीये का, या दाक्षिणात्य चित्रपटाच्या यशात मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा हात आहे. 

हा अभिनेता आहे, श्रेयस तळपदे याचा. अल्लू अर्जुनच्या ज्या डायलॉग्सवर टाळ्या पडतात, ते सर्व डायलॉग श्रेयसच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहेत. 

परिणामी या टाळ्या आणि चित्रपटाच्या यशामागचं श्रेय श्रेयसलाही जातं. 

सूत्रांच्या माहितीनुसार अल्लू अर्जुननंही यासाठी त्याचे आभार मानले आहेत. इतकंच काय, तर त्याचा आगामी चित्रपट आला वैकंठपुरमल्लू ( Ala Vaikunthapurramuloo) च्या हिंदी वर्जनसाठीही श्रेयसच आवाज देणार आहे. 

सध्याच्या घडीला जितकी अल्लू अर्जुनच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे, तितकीच प्रशंसा श्रेयसच्या आवाजाचीही होत आहे. अभिनय आणि आवाजाची ही बसलेली घडी या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत आहे.