कारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर

Raj Kundra Movie : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा त्याच्या कारागृहातील त्या 63 दिवसांविषयी सगळ्या गोष्टी चित्रपटात दाखवणार आहे. राज कुंद्रा त्याच्या आयुष्यातील या सगळ्यात मोठ्या घडामोडीवर चित्रपट बनवणार असून त्यात स्वत: अभिनय देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 20, 2023, 12:22 PM IST
कारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर title=
(Photo Credit : Social Media)

Raj Kundra Movie : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि त्याचे अॅपवर डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी त्याला अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा या प्रकरणात 63 दिवस आर्थर रोड तुरुंगात होता. आता राज कुंद्रा त्याच्या तुरुंगातील या 63 दिवसांवर एक चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रा पॉर्नोग्राफी कॉन्ट्रोवर्सीत अडकला होता. राजला या प्रकरणातून खूप 

पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, राज कुंद्रा तुरुंगातील त्याच्या 63 दिवसांच्या कहानीवर चित्रपट बनवणार आहे. वेबसाइटनं सुत्रांच्या आधारे दिलेल्या या माहितीनुसार,  राज कुंद्राच्या आयुष्यात असलेल्या या कॉन्ट्रोव्हर्सीवर काम हे शेवटच्या स्टेजवर आहे. राज कुंद्राच्या या चित्रपटात त्याचे तुरुंगातील दिवस असतील. यात आरोपी आणि गुन्हेगारांविषयी सगळ्यात जास्त दाखवण्यात येणार आहे. तर असे देखील म्हटले जात आहे की राज कुंद्रा स्वत: यात अभिनय करताना दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, चित्रपटाविषयी जास्त माहिती समोर आलेली नाही. सगळ्यांना हाच प्रश्न आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार आहे कारण या विषयी अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. तर चित्रपटाच्या स्क्रिप्टिंग पासून प्रोडक्शनपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये राज कुंद्रा लक्ष देणार आहे. तर चित्रपटात राज कुंद्रावर असलेल्या आरोपांपासून मीडिया रिपोर्ट्स ते तुरुंगात जाण्यापर्यंत सगळं आहे. याशिवाय त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आल्या विषयी देखील दाखवण्यात येणार आहे. मात्र, राज कुंद्राच्या या चित्रपटावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्यापासून त्यांना हॉटशॉट्स असे नाव असलेल्या अॅपवर चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन करण्याचा आरोप राज कुंद्रावर होता. राज कुंद्रानं काही काळापूर्वी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं होतं. राजनं सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत सांगितले की आज तुरुंगातून बाहेर येण्यास मला एक वर्षे पूर्ण झालं. माझ्यासोबत न्याय होईल आणि लवकरच सत्य सगळ्यांसमोर येईल. माझ्या चाहत्यांचे आभार आणि ट्रोल करण्याचे त्याहून जास्त आभारी आहे. कारण त्यांनी मला खूप जास्त स्ट्रॉंग बनवले. 

हेही वाचा : मणिपूरच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत सामूहिक अत्याचार प्रकरणी अक्षय कुमार संतापत म्हणाला, व्हिडीओ पाहून...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विषयी बोलायचे झाले तर 2009 मध्ये ते लग्न बंधनात अडकले. त्या दोघांना दोन मुलं असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शिल्पा आणि राज हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.