...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 28, 2018, 03:38 PM IST
...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार title=

मुंबई : बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी जमलीये. मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या गाडीतून तिची अंत्ययात्रा निघालीये.

यावेळी नववधूप्रमाणे श्रीदेवीला सजवण्यात आलेय. श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी श्रीदेवीचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. तसेच पोलिसांकडून तोफांची सलामीही देण्यात आली. 

श्रीदेवीला पद्मश्री या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय. त्यामुळेच तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत.