Trending News : मॉडेलिंग (Modelling) क्षेत्रात करिअर करणं म्हणजे निखाऱ्यांवरून चालणंच जणू, असं अनेजकण म्हणतात. बऱ्याचदा या गोष्टीत तथ्यही वाटतं. कारण, या क्षेत्रात तुमचा चेहरा ओखळला जातोच तोपर्यंतच काय ती प्रसिद्धी. त्यानंतर मात्र जे घडेल ते प्रत्येकाच्या नशिबाचाच भाग. मॉडेलिंग, रॅम्प वॉक (Ramp Walk), फॅशन शो (Fashion show) याविषयी अचानकच चर्चा होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर चर्चेत असणारा एक मुद्दा. जिथं एका मॉडेलच्या जाळीदार ड्रेसवरून वादंग माजलं आहे. (Model wears transparent dress grabs attention and anger on social media photos video viral )
2022 Miss Vietnam या सौंदर्यस्पर्धेच्या आयोजकांनी नुकतीच एका गंभीर प्रकरणासाठी जाहीर माफी मागितली आहे. या स्पर्धेदरम्यान माजी उपविजेती असा ड्रेल घालून आली, की त्याच्या जाळीदार कापडातून तिचं संपूर्ण शरीर स्पष्टपणे दिसत होतं. रॅम्पवर आल्यानंतर ती व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आली आणि तिच्यावर सर्व लाईट पडताच पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले.
आयोजक फसले...
Pham Ngoc Phuong Anh, 24 या मॉडेलनं स्टेजवर येऊन अनेकांना धक्काच दिला. तिनं वापरलेले कपडे टेलिव्हीजनवरही दाखवण्यालायक नव्हते असंच अनेकांचं मत. कारण, तिच्या आऊटफिटमुळं स्पर्धेच्या आयोजकांना निशाण्यावर घेत अनेकांनीच तोफ डागली. ज्यानंतर प्रकरणाला मिळालेलं गंभीर वळण पाहता आयोजकांनी सदर प्रकरणी जाहीर माफी मागितली.
फाम नावाच्या या मॉडेलनं घातलेला ड्रेस प्रथमदर्शनी अतिशय सुरेख होता. पण, ती जेव्हा प्रकाशात आली त्यावेळी ड्रेसचं कापड अंगावर असूनही तिचं शरीर सहजपणे दिसत होतं. ज्यावेळी फाम यावर्षीच्या उपविजेतीला पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर आली त्याचवेळी हे सर्व घडलं. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आणि फॅशनच्या नावावर काहीही खपवून घेतलं जाणार नाही, असंच अनेकजण म्हणाले.
आयोजकांचं काय म्हणणं?
फामच्या एका ड्रेसमुळं अडचणीत आल्यानंतर आयोजकांनी झाल्या प्रकरणी सारवासारव करण्यास सुरुवात केली. तिच्या लूकबाबत जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवाय सरावाच्या वेळी सर्व लाईट न लावल्यामुळं ड्रेस योग्य असल्याचंच भासलं. प्रत्यक्षात मात्र तो असा असेल याची कल्पना नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.