मुंबई : बॉलीवूड जगतात स्टार्सं जेवढे जास्त जास्त प्रसिद्धी मिळवतात. तितकंच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. असंच काहीसं सनी लिओनीसोबतही घडलं आहे. ज्याची आठवण करून अभिनेत्रीने तिची व्यथा सगळ्यांसमोर मांडली आहे.
2016 मध्ये सनी लिओनी तिच्या 'मस्तीजादे' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका टीव्ही चॅनलवर पोहोचली होती. यावेळी सनीची प्रमोशन दरम्यान एक मुलाखत घेण्यात आली, ज्यामध्ये तिला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले.
जसं 'तिला पॉर्न स्टार असल्याचा अभिमान वाटतो का? ती स्वतःला अभिनेत्री मानते का? तिला अभिनय कळतो का? अशा अनेक प्रश्नांनंतर सनी लिओनीला तिथून निघायचं होतं, पण तिला जाऊ दिलं नाही. मात्र, ही मुलाखत प्रसारित झाल्यावर मुलाखत घेणाऱ्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळी लोकांनी सनीला पाठिंबा दिला. ही गोष्ट आजही अभिनेत्रीच्या लक्षात आहे.
या गोष्टीला वर्षे लोटली असली तरी, या गोष्टींनी सनी लिओनीच्या मनात घर केलं आहे. ही जुनी मुलाखत आठवत सनी लिओनीने आता तिची व्यथा मांडली आहे. ती म्हणाली, 'लोक माझा तिरस्कार करतात आणि माझ्याबद्दल वाईट बोलतात आणि नंतर कोणीतरी टीव्हीवर माझा अपमान केला. आता मी ठीक आहे आणि मी ते स्वीकारलं आहे. मात्र मला त्याचं वाईट नक्कीच वाटलं होतं.
सनी लिओनीच्या मते, आता तिला लोकांच्या अशा गोष्टींची पर्वा नाही. परिस्थितीशी जुळवून घेत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सनी लिओनी लवकरच तामिळ आणि मल्याळम सिनेमात पदार्पण करणार आहे. याशिवाय ती 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटातही दिसणार आहे.