शाहिदच्या 'या' चित्रपटात मीराला करायचं काम !

 चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नसलेली मीरा आता या वातावरणात छान रुळली आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये तिने शाहिदच्या एका चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 09:32 PM IST
शाहिदच्या 'या' चित्रपटात मीराला करायचं काम ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : अलीकडेच शाहिदने त्याचा पद्मावतीतील त्याचा शाही लूक सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या शाही लूकबद्दल मीरा फार उत्साही असल्याचे दिसते. चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नसलेली मीरा आता या वातावरणात छान रुळली आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये तिने शाहिदच्या एका चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

शाहिदची मुख्य भूमिकेत असणाऱ्या कोणत्या चित्रपटात तुला भूमिका साकारायला आवडेल, असा प्रश्न विचारला असता मीराने लगेचच ‘पद्मावती’ या चित्रपटाचं नाव घेतलं होतं. मीराने शाहिदचा ‘महारावल रतन सिंह’ होण्यापर्यंतचा प्रवास प्रत्यक्षात पाहिला आहे, त्यामुळेच तिने ही इच्छा व्यक्त केली. 

‘पद्मावती’मध्ये दिसणारा शाहिदचा राजेशाही लूक आणि त्याचा एकंदर अंदाज पाहून मीरा फार प्रभावित झाल्याची माहिती खुद्द शाहिदनेच दिली. तिच्या या प्रतिक्रियेमुळे एका अर्थी शाहिदला सर्वात सुंदर प्रतिक्रिया मिळाली असंच म्हणावं लागेल.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटातील दीपिका आणि शाहिदचा लूक सर्वांसमोर आला असून आता रणवीर सिंग साकारत असलेला अलाउद्दीन खिल्जी कसा दिसणार हे जाणून घेण्याची  प्रेक्षकांना उत्सुकता आहे.