video - सुनील ग्रोवरचे नवे गाणे पाहिल्यावर तुमची दारू सुटेल...

कपिल शर्मा शो मध्ये कपिलसोबत दिसणाऱ्या 'डॉक्टर गुलाटी'ने म्हणजे सुनील ग्रोवर याने आपले प्रोफेशन बदलल्याचे दिसत आहे. आता तो कॉमेडियनचा गायक झाला आहे. प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 26, 2017, 08:59 PM IST
 video - सुनील ग्रोवरचे नवे गाणे पाहिल्यावर तुमची दारू सुटेल... title=
सुनील ग्रोवरच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ (सौ.यूट्यूब)

नवी दिल्ली : कपिल शर्मा शो मध्ये कपिलसोबत दिसणाऱ्या 'डॉक्टर गुलाटी'ने म्हणजे सुनील ग्रोवर याने आपले प्रोफेशन बदलल्याचे दिसत आहे. आता तो कॉमेडियनचा गायक झाला आहे. प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव आहे. बिल्ला शराबीचा व्हिडिओ आज  रिलीज होणार झाला आहे. 

यामध्ये आवाज माझा असून अमित त्रिवेदी हे म्यूजिक डिरेक्टर असल्याचे त्याने यापूर्वी ट्विट केले होते. 

 

हा व्हिडिओ शेअर करताना सुनील म्हटला की, दारू सोडण्यासाठी हा व्हिडिओ पुढील २० दिवस ३ वेळा पाहा, तुमची दारू सुटून जाईल. 

सुनीलचा बिल्ला शराबी हे गाणे सव्वा तीन मिनीटाचे आहे. त्यात सुनील दारुडा बनला आहे. आपल्या या वाईट सवयीमुळे सर्व ठिकाणी त्याला मार खावा लागतो. बिल्ला शराबी नावाच्या या व्यक्तीची प्रॉपर्टी विकली गेली आहे. बायको हैराण आहे, तर कोणी त्याला शिव्या देत आहे. पोलीस काठीने मारत आहे. नशेत टल्ली असलेल्या याला शुद्ध नाही किंवा आपण काय करतोय त्याचा पश्चताप नाही. 

तुम्ही जादूगार आहात. तुमच्यासोबत काम करण्याचा मान मिळाला असेही त्याने त्रिवेदी यांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या ट्विटचे उत्तर देण्यास उशिर केला नाही. ते म्हणाले, "सुनील ग्रोव्हर तुझ्यासोबत काम करणंही खूप मजेदार होतं. सुनील ग्रोव्हर तू अलौकिक आहेस. "

सुनील ग्रोव्हरने गाणे गाण्याची ही दुसरी वेळ आहे.  यापूर्वी त्याचे ‘मेरे हज्बैंड मुझको प्यार नहीं करते’हे गाणे हिट ठरले होते. याप्रकारे हे दुसरे गाणे देखील धमाकेदार असेल अशी आशा आहे.