मिलिंद सोमणची फटाके बंदीवर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर होतोय ट्रोल    

Updated: Nov 17, 2020, 04:35 PM IST
मिलिंद सोमणची फटाके बंदीवर प्रतिक्रिया  title=

मुंबई : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. एवढचं नाही तर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असणार मिलिंद कोणत्याही मुद्द्यावर मत मांडून त्याचे विचार चाहत्यांपर्यंत पोहोचवतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने मांडलेले विचार कधी चाहत्यांना आवडतात तर कधी आपल्या विचारांमुळे त्याला चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. 

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला काहींनी साथ दिली, तर काहींनी मात्र विरोध दर्शविला. फटाके बंदीवर मिलिंद सोमणने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. 

ट्विट करत मिलिंद म्हणाला, 'दिवाळीच्या मुहूर्तावर आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली, या निर्णयाला अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कळत नाही ते लसीच्यासोबत आहेत की विरेधात...' या ट्विटनंतर सोशल मीडियावर मिलिंद ट्रोल होत आहे.