'सॅम बहादुरमध्ये' विकी कौशल नाही तर मेघना गुलजारला पाहिजे होता 'हा' लोकप्रिय अभिनेता

Vicky Kaushal was not the first choice for Sam Bahadur : मेघना गुलजारला सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल नाही तर हवा होता हा अभिनेता! जाणून घ्या कोण आहे आणि का तो दिसला नाही चित्रपटात?

दिक्षा पाटील | Updated: Nov 26, 2023, 04:17 PM IST
'सॅम बहादुरमध्ये' विकी कौशल नाही तर मेघना गुलजारला पाहिजे होता 'हा' लोकप्रिय अभिनेता title=
(Photo Credit : Social Media)

Vicky Kaushal was not the first choice for Sam Bahadur : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा सॅम बहादुर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशलला पाहून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी दोन्ही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर विकीच्या अभिनयाची स्तुती होत आहे. मात्र, या चित्रपटात आपल्याला विकीच्या जागी दुसरा अभिनेता दिसला असता. कारण चित्रपटाची दिग्दर्शिका मेघना गुलजार यांची पहिली पसंत हा विकी नव्हताच. त्या आधी त्यांनी दुसऱ्या अभिनेत्याला विचारले होते पण काही कारणांमुळे सगळं काही जुळून आलं नाही. तो अभिनेता कोण आणि का त्यानं चित्रपटाला नकार दिला हे जाणून घेऊया. 

मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात विकी कौशल नाही तर रणवीर सिंह दिसला असताा. 'डीएनए'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, मेघनानं रणवीरशी सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेविषयी तेव्हा विचारले होते जेव्हा, ती दीपिका पदुकोणसोबत छपाक या चित्रपटात काम करत होती. मात्र, तेव्हा रणवीर सिंग हा जोया अख्तरच्या 'गली बॉय' आणि कबीर खानच्या '83' आणि करण जोहरच्या 'तख्त' या चित्रपटाच्या चित्रीकरणात किंवा तयारीत व्यस्त होता. रणवीरकडे त्यावेळी मेघनाकडून फक्त स्क्रिप्ट नरेशन करून घेण्याचा देखील वेळ नव्हता. त्यामुळे मेघनानं विकी कौशलला या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'मित्रांनीच रचला होता माझ्या हत्येचा कट, गच्चीतल्या पुलात मला...', ऑरीचा धक्कादायक खुलासा

सॅम बहादुरविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्यावर आधारीत आहे. मानेकशॉ हे 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्यावेळी आर्मीचे चीफ होते. त्याशिवाय ते भारताचे पहिले फील्ड मार्शल होणारे पहिले भारतीय आर्मी ऑफिसर होते. चित्रपटात विकी कौशलशिवाय सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यंदाच्या वर्षीचा हा विकीचा तिसरा चित्रपट आहे. या आधी विकीचा जरा हटके जरा बचके आणि द ग्रेट इंडियन फॅमिली हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सॅम बहादुरशिवाय विकी आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. तो चित्रपट म्हणजे डंकी. शाहरुख खानच्या या चित्रपटात विकी सह-कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.