महिलांना होणारा 'हा' गंभीर आजर तुम्हालाही आहे? अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

अभिनेत्रीने सांगितलेले उपाय तुम्हाला नक्की लाभदायक ठरतील   

Updated: Nov 2, 2022, 02:13 PM IST
महिलांना होणारा 'हा' गंभीर आजर तुम्हालाही आहे? अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय title=

Masaba on PCOS : Thyroid, PCOD, PCOS या समस्यांचा सामना अनेक महिला असतात. मला फक्त सर्वसामान्य महिलाच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील या आजारांचा सामना करत आहेत. अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) यांची मुलगी मसाबा गुप्ताने (masaba gupta) देखील PCOS चा सामना केला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने यावर  सोपे उपाय देखील सांगितले. आज मसाबाच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेवू, तिने महिलांना PCOS पासून बरं होण्यासाठी कोणते सोपे पर्याय सांगितले आहेत. 

मसाबाच्या अनुभवानुसार शरीराला तुम्ही काय देता आणि किती हालचाल करता याचं प्रमाण तुम्हाला या त्रासापासून दूर ठेवू शकतं. यांना कोणताही पर्याय उपलब्ध नाही असंही तिनं सांगितलं. सोबतच मन शांत ठेवणं, सतत चिडचीड न करणं, नकारात्मक विचार न करणं हे काही मुद्देही तिनं अधोरेखित केले.

ही एक हार्मोनल समस्या असून, प्रजनन काळादरम्यान सहसा हा त्रास जाणवतो. मसाबाच्या (Masaba Gupta) मते यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. अशा वेळी तुमच्या मैत्रीणींशी याविषयी संवाद साधत त्यांनी कोणत्या उपायांचा अवलंब केला हे जाणून घेणं फायद्याचं ठरेल असंही तिनं स्पष्ट केलं. पीसीओएस हा एक आजार नाही, असंही तिनं स्पष्ट केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा त्रास दूर करण्यासाठी आयुर्वेदात असणाऱ्या तरतुदी कायमच फायद्याच्या ठरल्या आहेत असं म्हणताना तिचा या उपचार पद्धतीवर असणारा विश्वास सर्वांसमक्ष आला. 

काय आहे पीसीओएस (what is pcos)? 
पीसीओएस ही एक अशी अवस्था आहे, जिथं स्त्रीच्या अंडाशयात एण्ड्रोजन अधिक प्रमाणात उत्पादित होतं. हे हार्मोंस पुरुषांशी संबंधित असून, ते महिलांमध्ये आढळतात. त्यांचं प्रमाण मात्र कमी असतं. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार याचे परिणाम आणि लक्षणं दिसून येतात. त्याच धर्तीवर उपचारही घेतले जातात. मसाबाही त्यातलीच एक होती. पण, तिला मोठी मदत केली ती मात्र आयुर्वेद आणि काही चांगल्या सवयींनी.