'लग्न झालेल्या महिला अभिनेत्री होण्यासाठी...' अंगूरी भाभीचा मोठा खुलासा

'भाभीजी घर पर हैं' च्या माध्यमातून अभिनेत्री शुभांगी अत्रेने कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं  

Updated: Apr 3, 2021, 03:19 PM IST
'लग्न झालेल्या महिला अभिनेत्री होण्यासाठी...' अंगूरी भाभीचा मोठा खुलासा  title=

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी मालिका 'भाभीजी घर पर हैं' च्या माध्यमातून अभिनेत्री शुभांगी अत्रेने कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण एक सामान्य मुलगी ते अभिनेत्रीपर्यंत तिच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींमधील एक म्हणजे तिचं लग्न. लग्न झालेल्या महिला अभिनेत्री होण्यास पात्र नसतात. असं शुभांगीने सांगितलं आहे. पण सर्व अडचणींवर मात करत शुभांगीने तिचं स्वप्न सत्य केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubhangi.A (@shubhangiaofficial)

शुभांगी म्हणाली, 'मझां लग्न फार कमी वयात झालं. तेव्हा खूप आनंदी होती, की मला आता मुंबईत जाता येईल आणि मी माझे स्वप्न पूर्ण करू शकेलं. पण जेव्हा मी बाहेर पडले, तेव्हा लग्न झालेल्या महिला अभिनेत्री होण्यास पात्र नसतात. असं सांगण्यात आलं. ' असं उत्तर मिळून सुद्धा शुभांगी थांबली नाही. 

'मी शेवटंपर्यंत माझे प्रयत्न सुरू ठेवले. माझ्या या प्रवासात मला माझ्या पती आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला. मला लहानपणापासूनचं अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. फार कमी वयात मी अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं.' असं शुभांगीने सांगितलं आहे. शुभांगीने आतापर्यंत 'कस्तूरी', 'दो हंसो का जोडा', 'चिडिया घर' अशा लोकप्रिय मलिकांमध्ये काम केलं आहे.