मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होतो. राजकारण, सामाज, खेळ, अभिनय प्रत्येक गोष्टींवर आज आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडता येतं. कलाकार देखील सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. दुसरी बाजू म्हणजे सोशल मीडियावर नेटकरी कलाकारांना ट्रोल देखील करतात. काही कलाकार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तर काही मात्र सडेतोडपणे उत्तर देतात.
अभिनेता शशांक केतक ने देखील ट्रोलरला चांगलेचं उत्तर दिले आहे. सध्या शशांक ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेतील त्याची खलनायकाची भुमिका त्याच्या एका चाहत्याला आवडली नसल्यामुळे त्याने गलिच्छ भाषेत कमेंट करत प्रतिक्रिया दिली. ‘कलाकरांशी आदराने वागा, पुण्य लाभेल’ शशांक केतकरने ट्रोलरला उत्तर दिलं.
चाहत्याच्या कमेंटवर शशांकने उत्तर दिले. तो म्हणाला, तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच ऍक्टिग सुरू करा. आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघायची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही सुद्धा कमेंटला रीऍक्ट होवू शकतो. अम्ही फक्त चेहरे असतो. असं देखील तो म्हणाला.
'आम्ही फक्त चेहरे आहोत. आमच्यावर किमान 15 जणं असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काही तरी करुन बघायचं होतं आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी पाहायचं होतं. ही मालिका आहे.. अजून खूप गोष्ट बाकी आहे… एक निगेटिव्ह पात्र असतं म्हणूनच पॉझिटिव्ह वागणारे हिरो असतात. मेणबत्तीचं अस्तित्व तेव्हाच जेव्हा बाजूला काळाकुट्ट अंधार असतो’असं उत्तर शशांकने ट्रोलरला दिलं.