मराठीतील पहिला 'माईम थ्रू टाईम' कार व्हिडिओ होतोय व्हायरल

Pravin Dabholkar | Updated: Mar 19, 2018, 04:33 PM IST

मुंबई : आज यूट्यूब ची रिच भरपूर आहे , नवीन पिढी आज सिरीयल ना बघता यूट्यूब वर वेब सिरीयस आणि प्रॅन्क किंवा इंटरेस्टिंग व्हिडिओस बघतात.

त्यातल्या त्यात मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. 
 
चारु, नम्रता गायकवाड, स्नेहा चव्हाण या आघाडीच्या अभिनेत्रींनी यामध्ये काम केलयं. मुखवटे acjn नावाचा यूट्यूब चॅनेल वर हा मराठी व्हिडिओ अपलो़ड करण्यात आलाय. याला दर्शकांची खूप पसंती मिळतेय.

५ मिनिटं ५१ कॉस्ट्यूम्स 

 या गाण्यात १७ वेगळे लूक्स आहेत , १५-१६ गाणी असून , ४-५ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ५१ कॉस्ट्यूम्स आहेत. माझ्या टीम नि दिवस रात्र एक करून १ दिवसात सगळं जमा केलं . सागर जाधव यांनी याच नृत्य दिग्दर्शन केलं तर दशरथ शेळके हे डीओपी होते.