मुंबई : 'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लंडनमध्ये अडकली आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे तिला लंडनमध्ये रहावे लागत आहे. रिंकू तिच्या आगामी ‘छूमंतर’ चित्रपटाच्या शुटिंगंच्या निमित्ताने सध्या लंडन दौऱ्यावर आहे. रिंकूसोबतच ‘छूमंतर’ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. याचा फटका फक्त रिंकूला बसला नसून संपूर्ण चित्रपटाच्या टीमला बसला आहे.
‘छूमंतर’ चित्रपटाचे शुटिंग इंग्लंडमध्ये सुरू आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे, रिषी सक्सेना अभिनेता सुव्रत जोशी आणि 'नाळ' चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेही इंग्लंडमध्ये शुटिंग करत आहे. लंडनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे कलाकार त्याठिकाणी अडकले आहेत.
'सैराट' चित्रपटानंतर रिंकूने चहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. तिने मराठी चित्रपटांशिवाय अनेक वेब सीरिजमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. रिंकूची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे.
आंतरराष्ट्रीय ट्रीपवर रिंकू म्हणते, 'मुंबई ते लंडन या प्रवासा दरम्यान मी अत्यंत आनंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.' अशी प्रतिक्रिया रिंकूने दिली.
'सैराट' ते लंडन असा प्रवास करण्याऱ्या रिंकूने सोशल मीडियावर स्वतःचे इंग्लंडमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.