Hemangi Kavi Facebook Post: मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमी तिच्या अतरंगी पोस्टमुळे चर्चेत असते. सामाजिक विषयावर हेमांगी आपलं रोखठोक मत मांडत असते. हेमांगी कवीची एक ही पोस्ट चांगलीच गाजली होती. चार चौघात न बोलल्या जाणाऱ्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' या विषयावर फेसबुक पोस्टवर (Facebook Post) करत तिने आपलं रोखठोक मत व्यक्त केलं होतं. अशातच आता हेमांगी कवीची आणखी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
हा आमचा Family photo!
माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी!
पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या Photo त.
लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते Photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले Photos/ Album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना Odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं! आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!
मी पण या सगळ्याला अपवाद नाही. मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई?
माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे!
दरम्यान, ओटीटीबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत की जिथं फक्त अश्लीलता, असभ्यता आणि समाजावर वाईट परिणाम करणारा मजकूर दिला जातो. पण असे भ्रम दूर करणारी मोहन आगाशे यांची दो गुब्बारे (Do Gubbare) ही वेबसिरीज खूप खास आहे. त्यावर आता हेमांगी कवीने रशिका आगाशे आणि कुशल ब्रदिके याला तुमच्या आयुष्यातील दु गुब्बारे मुव्मेंट सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे.सध्या हेमांगी कवी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे.