Salman Khan and Aishwarya Rai Relationship : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यांच्या लव्ह स्टोरी पूर्ण व्हायला हवी होती असे त्यांच्या अनेक चाहत्यांचे मत होते. त्या दोघांमध्ये काही तरी वाद झाला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नाही. तरी देखील आजही त्यांच्याविषयी अनेक गोष्टी म्हटल्या जातात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. त्या दोघांनी 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' या चित्रपटांमध्ये काम केले. दरम्यान, या दोनही चित्रपटांमध्ये त्या दोघांच्या विरुद्ध भूमिका पाहायला मिळाल्या. तर असं म्हटलं जातं की 'देवदास' या चित्रपटात सलमान खान ऐश्वर्याच्या व्हॅनिटीच्या बाहेर नशेत धूत पडलेला असायचा.
याविषयी लोकप्रिय जर्नलिस्ट अनुपमा चोप्रानं बायोग्राफीत 'देवदास' या चित्रपटाच्या शूटिंगविषयी सांगितलं. यावेळी त्यांनी सांगितलं की सलमान खान चित्रपटाच्या सेटवर उपस्थित होता. ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खाली मद्यधुंद अवस्थेत पडलेला असायचाय ही ती वेळ होती जेव्हा त्या दोघांमध्ये हळू-हळू दुरावा येऊ लागला आणि ऐश्वर्याला त्या रिलेशनशिपमधून बाहेर यायचे होते. दुसरीकडे सलमानला याचा खूप त्रास होत होता. इतकंच नाही तर त्यांच्या रिलेशनशिपला वाचवण्यासाठी सलमान खूप प्रयत्न देखील करत होता.
खरंतर असं म्हटलं जातं की सलमान खान या चित्रपटाच्या कास्टिंगवरून खूप उत्सुक होता. मात्र, जेव्हा संजय लीला भंसाळी यांनी सलमान खान ऐवजी या चित्रपटात शाहरुख खानला कास्ट केलं तेव्हा तो सतत सेटवर उपस्थित राहू लागला. इतकंच नाही तर, चित्रपटातील क्रूमधील अनेक कलाकारांनी देखील त्याला पाहिले होते. तर या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्या अखेरचे स्क्रिनवर दिसले होते.
हेही वाचा : 'फ्लॉप सिस्टर्स' म्हणणाऱ्या नेटकऱ्याला क्रिती सेननच्या बहिणीनं दिलं सडेतोड उत्तर
शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात एक सीन होता. ज्या सीनमध्ये शाहरुखला ऐश्वर्याच्या पायातून काटा काढायचा होतो. खरंतर, सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण सलमान खाननं स्वत: या सीनचा डेमो दिला होता पण एका वेगळ्या पद्धतीनं. दरम्यान, सलमान हा डेमो देत असताना संजय लीला भन्साळी यांनी कॅमेरा चालू ठेवला आणि हा सीन शूट केला. त्यांनी हा सीन डिलीट केला नाही. तर रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांनी हाच सीन चित्रपटात वापरला फक्त चेहरा बदलण्यात आला.