'याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही', मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखलेंनी एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी विक्रम गोखलेंकडून अनेक हिंदी कलाकार एक गोष्ट शिकले, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. 

Updated: Feb 10, 2024, 10:27 PM IST
'याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही', मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा title=

Milind Gawali Remember Vikram Gokhale : रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा सर्वच माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक म्हणजे विक्रम गोखले. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी विक्रम गोखलेंकडून अनेक हिंदी कलाकार एक गोष्ट शिकले, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. 

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मिलिंद गवळी झळकत आहेत. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता मिलिंद गवळी यांनी दोन शब्दांमधील विरामाचा अर्थ सांगितला आहे. त्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून अनेक हिंदी कलाकार pause कुठे कसा घ्यायचा हे शिकले, असा खुलासा त्यांनी केला आहे. 

मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा 

"एकदा का स्क्रिप्ट हातात आली , की मग त्यामध्ये काय लिहिलं आहे त्याच्यापेक्षा, दोन वाक्यांमध्ये जे न लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय सापडतोय का ते शोधायचा मी नेहमी प्रयत्न करतो. खरच कधी कधी न लिहिलेल्या शब्दांमध्येच बराच अर्थ दडलेला असतो, आपण एखाद्या व्यक्तीला खूप चांगले ओळखत असू तर त्याच्या न बोललेल्या शब्दांचेही अर्थ आपल्याला समजायला लागतात, तसंच “pause” म्हणजे मराठीमध्ये “विराम” याला पण खूप अर्थ असतो, विक्रम गोखले हे उत्कृष्ट अभिनेते होते, वाक्यांमध्ये कुठे आणि कसा pause घ्यायचा आणि तो किती घ्यायचा यामध्ये त्यांचा हात आज तागायत कुठलाही अभिनेता धरू शकला नाही, मोठमोठे हिंदीतले अभिनेते सुद्धा त्यांच्याकडून ते pause घेणे शिकले.

पण एखाद्या साधारण कलाकारांनी जर वाक्यात पॉज घेतला तर तो वाक्य विसरला असंच समजलं जातं, हे झालं कलाकारांचं पण साधारण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा या पॉजला खूप महत्त्व आहे, म्हणजे पोलीस जेव्हा आरोपीची चौकशी करताना तेव्हा तो प्रश्नांची उत्तर देताना कुठे कुठे पोज घेतोय याच्यावरून तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्यांना लगेच समजतं. मी लहान असताना घरी माझा एखादा मित्र आला आणि मी त्याला जर समजा असा प्रश्न विचारला “काय रे जेवून आलास का तू ? “ तर त्याच्या पॉज मध्ये माझ्या आईला कळायचं की हा मुलगा उपाशी आहे आणि ती लगेच त्याला आग्रह करून जेवायला वाढायची.

माझी आई कधीच कोणालाही तू जेवून आलास का ? की तू चहा घेणार आहेस का ? असं कधीच विचारायची नाही. तिच्या वाक्यामध्ये असायचे “चहा ठेवलाय, किंवा जेवायला वाढते आहे ! तुम्ही जेवायला बसा ! या वाक्यामध्ये आणि तिच्या त्या जेवण वाढायच्या कृतीमध्ये ती कधीही पॉज घ्यायची नाही, त्यामुळे समोरच्या माणसाला हो किंवा नाही , हा विचार करायलाच वेळच मिळायचा नाही, त्याला थेट जेवायलाच बसायला लागायचं. कला “आई कुठे काय करते” च्या सेट वर सीन च्या मद्धल्या वेळेत मी अंगणात शांत बसलो होतो आणि तिथे आमचा यश म्हणजे अभिशेक देशमुख आला आणि त्याने pause न घेता माझे photos आणि videos काढले. अभी मी तुझा खुप खुप आभारी आहे. तू स्वतः हून निसंकोच पणे हे असं गोड गोड वागतोस", असे मिलिंद गवळी यांनी म्हटले. 

दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टवर अभिषेक देशमुख याने कमेंट केली आहे. त्याने हात जोडण्याचा आणि हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. तर अनेक चाहते हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट करताना दिसत आहेत.