सुपरसे ऊपर ! मलायका अरोराचा जिममधील डान्स तुफान व्हायरल

मलायका अरोरा सिनेविश्वातील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.   

Updated: Mar 20, 2021, 02:47 PM IST
सुपरसे ऊपर ! मलायका अरोराचा जिममधील डान्स तुफान व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सिनेविश्वातील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. मलायका तिच्या सौंदर्याने कायम चाहत्यांना घायाळ करते. मलायका आता अभिनयापासून दूर असली तरी  ती टीव्ही शोमध्ये परीक्षकाच्या रूपात झळकते. एवढचं नाही तर ती कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. आता देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या व्हिडिओमध्ये ती जिममध्ये डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्स अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. मलायकाने हा व्हिडिओ पोस्ट करताच 13 लाखपेक्षाही जास्त वेळा बघीतला आहे. मलायकाच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ फार आवडला आहे. फक्त मलायकाचे चाहत्यांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या व्हिडिओला लाईक केलं आहे. 

दरम्यान, मलायका कायम सोशल मीडियावर फोटो  आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्याचप्रमाणे ती योगा, वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट  करत चाहत्यांना फिटनेस गोल देत असते.