फ्रंट कट गाऊन घातल्यानं Malaika Arora ट्रोल; नेटकरी म्हणाले, ''उर्फीची आंटी आली''

Malaika Arora Trolled Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मलायका अरोराच्या ड्रेसची (Malaika Arora Trolled at Chivas 18 Alchemy Event). फ्रन्ट कटआऊट पिंक गाऊन घातल्यानं मलायका ट्रोल झाली आहे. तिला चक्क उर्फीची (Urfi Javed) आन्टी असं संबोधण्यात आलं आहे. सध्या तिच्या या व्हिडीओनं (Viral Video) सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

गायत्री हसबनीस | Updated: May 7, 2023, 03:52 PM IST
फ्रंट कट गाऊन घातल्यानं Malaika Arora ट्रोल; नेटकरी म्हणाले, ''उर्फीची आंटी आली'' title=
Photo - @viralbhayani

Malaika Arora Trolled in Pink Front Cut Dress: मलायका अरोरा आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी (Malaika Arora Look) ओळखली जाते. तिचा फिटनेस लुक तर अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो त्यामुळे मलायका अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोलही होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Malaika Arora Trolled) झाला आहे. ज्यात तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे मलायका अरोरा ट्रोल झाली आहे. यावेळी तिची तुलना तर सरळ उर्फी जावेदशी केली आहे आणि तिचा उल्लेख सरळ 'उर्फी की आंटी' (Urfi Ki Aunty) म्हणून केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मलायकाचा हा लुक पाहून तिची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली आहे. 

मलायका अरोरा चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर आणि ओटीटीवर सक्रिय आहे. त्यामुळे अनेकदा ती आपल्या आगळ्यावेगळ्या आऊटफिट्सला ट्राय करत असते आणि सार्वजनिक आयुष्यात अपियर होताना दिसते. ती अनेक मोठमोठ्या इव्हेंट्सलाही हजेरी लावत असते. नुकत्याच तिनं एका मोठ्या इव्हेंटला हजेरी लावली होती. Chivas 18 Alchemy नावाच्या एका इव्हेंटला ती स्पॉट झाली. यावेळी तिनं हटके पिंक गाऊन घातला होता. यावेळी तिच्या बोल्ड ड्रेसची चर्चा रंगली होती. सध्या हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Malaika Arora Spotted at Chivas 18 Alchemy event gets troll after wearing front cut gown video viral)

हेही वाचा -  VIDEO: जेनेलियासोबत रियान आणि राहिलनं जोडले पापाराझींसमोर हात! पाहून सासूबाई भारावल्या अन्

हटके आऊटफिट

Chivas 18 Alchemy हा एक व्हिस्कीचा ब्रॅण्ड आहे. त्याच्या या इव्हेंटला मलायका अरोरासोबतच अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती. परंतु एव्हाना पापाराझींचे लक्ष वेधले ते म्हणजे मलायका अरोराच्या आऊटफिटवरती. मलायकानं यावेळी अत्यंत डीप नेक असा गाऊन घातला होता. हा फ्रंट कट पिकं ड्रेस (Front Cut Pink Dress) पाहून चाहत्यांनी तिच्या लुकचही कौतुक केलं आहे परंतु तिला ट्रोलही केलं आहे. यावेळी तिनं गाऊनला सुटेबल असा मेकअप केला आहे आणि लांब सरळ इयरिंग्स घातले आहेत आणि हातात क्लच घेतले आहेत. या कल्चला डायमंड लावलेले दिसत आहेत तर तिनं हातातल्या एका बोटात रिंग घातली आहे. 

ट्रोलर्सनी केलं ट्रोल 

सध्या मलायकाचा एक व्हिडीओ 'विरल भयानी'नं त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. यावेळी तिला ट्रोलर्सकडून टीका सहन करावी लागली आहे. काहींना तिच्यावर सडकून टिका केली आहे तर काहींनी तिच्या लुकचे कौतुकही केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक युझरनं लिहिलंय की, ''हिची चाल कधी सरळ होणार आहे?'' आणि त्यापुढे हॅशटॅगमध्ये लिहिलंय की 'अर्जून्स मॅजिक' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''अरे ही लोकं आपलं रूप आरश्यापुढे पाहतात की नाही?'' काहींना म्हटलंय की, ''ही तर उर्फीची आंटी आहे.''