मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? ब्रेकअपनंतर 'मिस्ट्री मॅन'सोबत व्हॅकेशन फोटो पोस्ट करताच अर्जुन म्हणाला, 'शांततेसाठी…'

Malaika Arora Mystery Man Viral Pic : मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगली आहे. मिस्ट्री मॅनसोबतचा व्हॅकेशन फोटो पोस्ट केल्यानंतर अर्जुनही इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवलंय.  

नेहा चौधरी | Updated: Jul 18, 2024, 10:52 AM IST
मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? ब्रेकअपनंतर 'मिस्ट्री मॅन'सोबत व्हॅकेशन फोटो पोस्ट करताच अर्जुन म्हणाला, 'शांततेसाठी…' title=
Malaika Arora in love again On vacation with the mystery man after her breakup with Arjun Kapoor Instagram status

Malaika Arora Mystery Man Viral Pic : बॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात अर्जुन कपूर एकदा दिसला. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता मलायका अरोरा कुठे आहे? अशात अर्जुन आणि मलायका यांचा ब्रेकअप झाला हे निश्चित असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यात मलायका स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असतानाचे फोटो समोर आलेत. (Malaika Arora in love again On vacation with the mystery man after her breakup with Arjun Kapoor Instagram status)

मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? 

त्यात भर म्हणजे मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका मिस्ट्री मॅन'सोबत सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचा फोटो स्टेट्सवर ठेवा आहे. त्यानंतर अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

तिने स्टेट्सला सुट्टीमध्ये एन्जॉय करत असतानाचा फोटोंचा एक कोलाज शेअर केलाय. ज्यामध्ये ती निऑन कलरची बिकिनी घालून ड्रिंक आणि जेवणाचा आनंद घेत आहेत. त्यासोबत मिस्ट्री मॅनचा एक फोटो, शिवाय त्या कोलाजवर तिने दिल वाला इमोजी टाकला आहे. त्यामुळे हा पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसणारा हा व्यक्ती आहे तरी कोण? सोशल मीडियावर मात्र ती या मिस्ट्री मॅनला डेट करत आहे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. महत्त्वाच म्हणजे मलायकाने या व्यक्तीचा फोटो स्पष्ट दाखवला नाहीय. 

अर्जुन म्हणाला, 'शांततेसाठी…'

दुसरीकडे मलायका अरोराने इन्स्टाग्राम स्टेट्स ठेवल्यानंतर काही वेळानंतरच अर्जुनेही त्याचा इन्स्टाग्रामवर स्टोरीवर (Arjun Kapoor Instagram status) एक स्टेट्स ठेवलंय. ज्यात अभिनेत्याने लिहिलंय की, 'शांततेसाठी उपस्थिती आवश्यक' असं लिहिलंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे की, अर्जुनने हे स्टेट्स मलायकाच्या फोटोमुळे ठेवलं आहे. 

ब्रेकअपवर मलायका-अर्जुनच मौन

खरं तर या दोघांनी आपल्या प्रेमाबद्दल सर्वांसमोर मोकळेपणाने सांगितलं होतं. पण आज मात्र त्यांच्या ब्रेकअपबद्दल या दोघांनी काहीही अधिकृत वक्तव्य केलं नाहीय. पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार, सूत्राने सांगितलं की, 'मलायका आणि अर्जुनचं नातं खूप खास होतं आणि ते दोघेही एकमेकांच्या हृदयात खास स्थान आहे. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि या प्रकरणी त्यांनी आदरपूर्वक मौन पाळलंय.'